Posts

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी

Image
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी : कार्यकारिणी जाहिर ** करमाळा: प्रतिनिधी  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड. नईम काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन या संघटनेची  करमाळा तालुक्यातील  कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन च्या करमाळा शाखेत आयोजित कार्यक्रमात  करमाळा तालुका शहरातील पदाधिका-यांना ॲड. नईम काझी  यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी  तालुका उपाध्यक्षपदी राजू बागवान ,  मेहमूद शेख , तालुका सचिवपदी जिलानी शेख,शहराध्यक्षपदी फिरोज शेख, उपाध्यक्षपदी शाहरुख शेख , सचिवपदी गुलाम सय्यद यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. शिवराज जगताप,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरउपाध्यक्ष आझाद शेख,  सामाजिक कार्यकर्ते ॲड. योगेश  शिंपी , रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सूरज शेख, उपाध्यक्ष  ईमत्याज पठाण, झिशान कबीर , एअरफोर्सचे नॅशनल हाॅलीबॉल पटू जाहीद काझी, बिलाल शेख, राजू सय्यद, अ...

महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : Adv. माया जमदाडे

Image
*महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : एड. माया जमदाडे* करमाळा दि. २७ प्रतिनिधी  भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये  विविध विषयावर प्रबोधन करून जागृती निर्माण करण्यासाठी परिवर्तन यात्रा सुरु असून सदर परिवर्तन यात्रा करमाळा येथे आली असता यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष एड. माया जमदाडे बोलत होत्या. यावेळी सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रज्ञाताई कांबळे या उपस्थित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राज्यध्यक्षा संगीता शंदे आणि उपध्याक्षा ज्योती मिसाळ उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मांजरगाव ग्रामपंचायत सदस्या काजल खरात, अर्बन बँक संचालिका वंदना कांबळे आणि आशाताई क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना एड माया जमदाडे म्हणाल्या कि, आज भारतामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या हक्क अधिकारावर बंधने आणली जात आहेत. महिलांच्या ...

करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी

Image
करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी --  करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांना शांततेची अपील केली तर कोणत्याही समाजावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे तरच आपण देश हिताकडे जाऊ असे सांगितले.तसेच जागतिक आतंकवाद वाढण्यास अमेरिका,इंग्लंड, फ्रान्स व इटली हे देश जबाबदार आहेत असे सांगितले.

करमाळ्यात सामाजिक संघटनांनी विविध उपक्रम घेत डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली.

Image
*करमाळ्यात सामाजिक संघटनांनी विविध उपक्रम घेत डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली* करमाळा दि १५ प्रतिनिधी  विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त करमाळा येथील बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, अल कुरेश यंग ग्रुप, छत्रपती क्रांती सेना, बहुजन विकास बचत गट आदी समविचारी सामाजिक संघटनांनी शहरात विविध उपक्रम घेत डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी या संघटनांकडून सकाळी  करमाळा येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सायंकाळी जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच मिरवणुकीत सामील भीम सैनिकांना पंजाब वस्ताद चौक येथे शरबतचे वाटप करण्यात आले.  यावेळी भिमजयंती उत्सव समितीचे दशरथ कांबळे, नागेश कांबळे, रमेश कांबळे, मुकुंद कांबळे, दीपक ओहोळ, लक्षण भोसले, एड. महादेव कांबळे, जितेश कांबळे, जयकुमार कांबळे, राजू आव्हाड, देवा लोंढे आदी पदाधिकारी यांचे माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, छत्रपती क्रांती सेना संयोजक आर. आर...

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता.

Image
कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता...... . *युवा नेते शंभूराजे जगताप यांनी ऊस उत्पादक शेतकरी , ऊस वाहतुकदार व कारखान्याचे कामगार यांच्या देण्या बद्दलची प्रसार माध्यमांमध्ये मांडलेली वस्तूस्थिती बागल गटाच्या नेत्यांनी टिका समजू नये* - वनराज घोलप , अध्यक्ष ,किंग्ज फाऊंडेशन , करमाळा                                  करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याच्या माध्यमातून स्वतः च्या कुटुंबाची प्रगती करून घेतलेल्या बागल गटाच्या नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कळवळ्याच्या नावाखाली स्व . दिगंबर बागल मामा यांच्या जंयती निमीत्त दि . ९ मार्च पासून २- ३ दिवस कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . आदिनाथ - मकाई च्या कामगारांच्या रखडलेल्या पगारीमुळे कित्येक कामगारांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत . काही कामगारांनी आत्महत्या केल्यामुळे , आर्थिक चणचणी च्या तणावाखाली जगत असताना काहींना हर्ट अटॅक येऊन जीव गमवावे...

*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात

Image
*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात* करमाळा दि.25 प्रतिनिधी. माता रमाई जयंती, संत रविदास महाराज जयंती व लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांचे वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैध्द मातंग चर्मकार ऐक्य परिषदेसाठी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते नेणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे.    ही परिषद 26 फ्रेब्रुरवारी 2023 रोजी रात्री सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे होणार आहे. या परिषदेचे उदघाटन सोलापूरचे विचारवंत प्रा.डॉ. संघप्रकाश दुड्डे यांच्या हस्ते तर परिषदेचे अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय आध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.  या परिषदेच्या विद्वान, कर्तुत्ववान, माणसे नसले तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवी, विद्येचा तुडवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सोलापूर, १४ जाने. १९४६) एक गंभीर चर्चा या विषयासह इतर महत्वाच्या...

युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.

Image
युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात  स्पष्ट भूमिका..... [ वीज बील भरले नाही तर भविष्यातील एमएसईबी च्या खासगीकरणाचा खूप मोठा धोका आहे तो धोका टाळण्यासाठी व वीज आठ तास - दहा तासा ऐवजी अखंड मिळवण्या साठी शेतकऱ्यांनी नियमीत वीज बील भरण्याची सवय लावून घेतली पाहीजे]                       सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्र विद्यूत वितरण कंपनी कडून चालु वीज देयक भरण्या संदर्भात निघालेल्या फतव्या मुळे व विज कनेक्शन तोडणी मोहीम चालु झाल्या मुळे बील भरण्या संदर्भात बळीराजा संभ्रमावस्थेत आहे . शासन वा लोक प्रतिनिधींकडूनही अजून स्पष्ट भूमिका दिसत नाही . मात्र जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे यांनी  शेतकऱ्यांनी वीज बील भरण्याबाबत स्पष्ट भूमिका घेत शेतकऱ्यांना सकारात्मक विचार करून चालु वीज बील भरण्याबाबत आवाहन केले आहे. चालु वर्षी पाऊस चांगला झाल्याने अतिवृष्टी मूळे काही पिकांचे नुकसान झाले असले तरी मका व ऊसासारखी पिके जोमात आलेली होती . करमाळा तालुक्यातील ऊसाचे बऱ्यापैकी गाळप झाले...