महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : Adv. माया जमदाडे
*महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : एड. माया जमदाडे*
भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध विषयावर प्रबोधन करून जागृती निर्माण करण्यासाठी परिवर्तन यात्रा सुरु असून सदर परिवर्तन यात्रा करमाळा येथे आली असता यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष एड. माया जमदाडे बोलत होत्या.
यावेळी सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रज्ञाताई कांबळे या उपस्थित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राज्यध्यक्षा संगीता शंदे आणि उपध्याक्षा ज्योती मिसाळ उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मांजरगाव ग्रामपंचायत सदस्या काजल खरात, अर्बन बँक संचालिका वंदना कांबळे आणि आशाताई क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना एड माया जमदाडे म्हणाल्या कि, आज भारतामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या हक्क अधिकारावर बंधने आणली जात आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ओबीसी ची जातनिहाय जनगणना न करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. आज देशामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचारात वाढला आहे. यावर विविध स्तरातून आंदोलने होत आहे परंतु कोणाचेही समाधान होत नाही, कारण या देशात निवडून येणारे सरकार हे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडून येत आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या मताची गरज राहिलेली नाही. यावर राष्ट्रव्यापी जनआंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलनाची निर्मिती केली जात आहे. महिलांनी आपल्या समस्येचे समाधानासाठी भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटने मध्ये सामील होण्याचे आवाहन एड माया जमदाडे यांनी केले.
यावेळी योगेश्वरी माने, सुरेखा ओहोळ, कोन्ताबाई मिसाळ, रेणुका कांबळे, मंगल पाटील, कोमल कांबळे, प्रिया कांबळे, चंद्रकला कांबळे, शोभा सस्ते, रंजना विटकर, अश्विनी माने, रुपाली गोडगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
यावेळी सूत्रसंचालन हसीना शेख यांनी केले तर आभार नलिनी कांबळे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा करमाळा युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment