बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

*बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन*

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी लेझर खतना कॅम्प या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच या कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केली आहे.

सदरची खतना सोलापूर येथील सुप्रसिद्ध खतना स्पेशलिस्ट डॉक्टर हाजी नासीर सय्यद हे करणार आहे.

सदर लेझर खतना कॅम्पचे उद्घाटक एडवोकेट हाजी कलीम काझी तालुकाध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते ठेवण्यात आले असून सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काजी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफीभाई काजी, तसेच तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक जेलर समीर पटेल, तसेच हयात मेडिकल अहमदनगर येथील आदिल याकूब शेख, तसेच हाजी कलीम काजी सर दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख मंडल अधिकारी हाजी सादिक काजी बार्शी येथील निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई शेख भुमचे सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर पठाण सर तसेच डॉक्टर सादिक बागवान करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद तसेच उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी हाजी युसुफ आतार तसेच करमाळा शहरातील मशिदींमधील प्रमुख धर्मगुरू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 सदर कार्यक्रमाचे संयोजक म्हणून हाजी समीर हाजी अहमद शेख हे लाभणार असून सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कयूम हमीद शेख 8600617762, जमीर जमीर शब्बीर शेख 7588020786, युनूस बबलू पठाण 8484005584, शौकत यासीन शेख मोबाईल नंबर 9107867786, अखिल कासम सय्यद 9623241333, अमीन रशीद बेग 9075178688, मोबीन चांद बागवान 7264037008, तसेच तोफिक हमीद शेख 9420786900, इत्यादींनी केले आहे

सदर लेझर खतना कॅम्पचे लाभ घेण्याचे आव्हान करमाळा शिरूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने घ्यावे असे आवाहन बहुजन विकास संस्था चे संस्थापक अध्यक्ष इसाक पठाण यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर