करमाळा पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘रामभरोसे’; विकासकामांना ब्रेक, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष!ऐतिहासिक ‘सात विहीर’ परिसराची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा पत्ता नाही; जगताप गटाचा प्रशासनावर कडाडून हल्ला
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा शहराच्या विकासाचा रथ सध्या पूर्णपणे रुतलेला दिसत असून, नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘सात विहीर’ (सात नळाची विहीर) परिसरातील दुरवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करायच्या अत्यावश्यक कामांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘सात विहीर’ परिसरातील विधींसाठी नागरिकांची फरफट करमाळा शहरातील ऐतिहासिक 'सात विहीर' हे केवळ एक ठिकाण नसून ते भावनेशी जोडलेले स्थळ आहे. अंत्यविधीनंतरचे दहाव्याचे विधी प्रामुख्याने याच ठिकाणी पार पडतात. मात्र, सध्या या विहिरीपाशी कोणतीही सोय शिल्लक नाही. प्रशासकीय काळात झालेल्या दुर्लक्षामुळे येथील शेड आणि कट्ट्याची अवस्था बिकट झाली आहे. आता पावसाळा तोंडावर असताना, विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर बसावे लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. नगरपालिकेने तातडीने येथे बैठक व्यवस्था (कट्टा) आणि शेड उभारावे, अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळा पूर्व कामे कागदावरच? शहरात पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत,...