करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. करमाळा नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर अनुसूचित जाती महिलांसाठी २ व सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गुरुवारी (ता. १०) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला असून यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत. अशी आहे प्रारूप प्रभाग रचना : *प्रभाग क्रमांक 1* : लोकसंख्या २५१७, अनुसूचित जाती ३८७, अनुसूचित जमाती ३७. प्रभागाची व्यप्ती : कानडे वस्ती, सुमंतनगर, कुंभारवाडा, किल्ला वेस, मोहल्ला. प्रभागाची सीमा : उत्तर : कानडे वस्ती ते पूर्वेकडील नालबंद वस्ती, ओढा ते नगरपालिका हद्द. पूर्व : नालबंद वस्ती ओढा, नगरपालिका हद्द ते मार्केट यार्ड कंपाऊंड पश्चिम बाजू, राहुल सावंत घर ते वांगडे बोळीतून मोकने सर घर ते सुशील वनारसे घर. दक्षिण : सुशील वनारसे ते नंदू चिवटे दुकान ते नारायण जाधव घर ते किल्ला तटबंदी उत्तर बाजूने संभाजी नगर भिसे घर ते सुमंतनगर, सांगळे सर घर पर्यंत. प...
Comments
Post a Comment