ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी
**
करमाळा: प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड. नईम काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन या संघटनेची करमाळा तालुक्यातील कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन च्या करमाळा शाखेत आयोजित कार्यक्रमात करमाळा तालुका शहरातील पदाधिका-यांना ॲड. नईम काझी यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी
तालुका उपाध्यक्षपदी राजू बागवान , मेहमूद शेख , तालुका सचिवपदी जिलानी शेख,शहराध्यक्षपदी फिरोज शेख, उपाध्यक्षपदी शाहरुख शेख , सचिवपदी गुलाम सय्यद यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. शिवराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरउपाध्यक्ष आझाद शेख,
सामाजिक कार्यकर्ते ॲड. योगेश शिंपी , रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सूरज शेख, उपाध्यक्ष ईमत्याज पठाण, झिशान कबीर , एअरफोर्सचे नॅशनल हाॅलीबॉल पटू जाहीद काझी, बिलाल शेख, राजू सय्यद, अमीर शेख, साहिल कुरेशी, आरशान पठान, सालिम सय्यद, सरफराज काझी, फुरकान काझी, इरफान काझी (सर) आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ॲड. योगेश शिंपी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे खजीनदार आझाद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व
सूत्रसंचालन युसूफ शेख (सर) यांनी केले. अमीर शेख, रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष इमत्याज पठाण, आनंद फरतडे, गौरव सामंत आदि नी परिश्रम घेतले. आभार ॲड. नईम काझी यांनी मानले.
Comments
Post a Comment