करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी
करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी --
करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांना शांततेची अपील केली तर कोणत्याही समाजावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे तरच आपण देश हिताकडे जाऊ असे सांगितले.तसेच जागतिक आतंकवाद वाढण्यास अमेरिका,इंग्लंड, फ्रान्स व इटली हे देश जबाबदार आहेत असे सांगितले.
Comments
Post a Comment