*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात

*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात*

करमाळा दि.25

प्रतिनिधी.
माता रमाई जयंती, संत रविदास महाराज जयंती व लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांचे वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैध्द मातंग चर्मकार ऐक्य परिषदेसाठी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते नेणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे.

   ही परिषद 26 फ्रेब्रुरवारी 2023 रोजी रात्री सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे होणार आहे. या परिषदेचे उदघाटन सोलापूरचे विचारवंत प्रा.डॉ. संघप्रकाश दुड्डे यांच्या हस्ते तर परिषदेचे अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय आध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.

 या परिषदेच्या विद्वान, कर्तुत्ववान, माणसे नसले तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवी, विद्येचा तुडवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सोलापूर, १४ जाने. १९४६) एक गंभीर चर्चा या विषयासह इतर महत्वाच्या विषयावर प्रा.डॉ. विलास खरात, विजयराज सेगेकर,अॅड. राहुल मखरे, विकास पाथरीकर, गोरख वेताळ हे मार्गदर्शन करणार आहेत.  

या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून बामसेफचे दीपक देवाळकर, आरपीआयचे नागेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश कांबळे, डोमेट्रिक पार्टीचे सोहन लोंढे, चर्मकार महासंघाचे  विनायक भगत, लहुजी शक्ती सेनाचे सुधाकर पाटोळे, फादर योहान कानेपागुल, डॉ. कुमार लोंढे, बाळासाहेब राखपसारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी करमाळा तालुका युनिटच्या वतीने विविध गावातून कार्यकर्त्यांसह काॅर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीतून जनजागृती करण्याचे काम चालू आहे. त्यास सर्व स्तरातील कार्यकर्त्यांसह नारीकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन गौतम खरात यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर