युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.
युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका..... [ वीज बील भरले नाही तर भविष्यातील एमएसईबी च्या खासगीकरणाचा खूप मोठा धोका आहे तो धोका टाळण्यासाठी व वीज आठ तास - दहा तासा ऐवजी अखंड मिळवण्या साठी शेतकऱ्यांनी नियमीत वीज बील भरण्याची सवय लावून घेतली पाहीजे] सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्र विद्यूत वितरण कंपनी कडून चालु वीज देयक भरण्या संदर्भात निघालेल्या फतव्या मुळे व विज कनेक्शन तोडणी मोहीम चालु झाल्या मुळे बील भरण्या संदर्भात बळीराजा संभ्रमावस्थेत आहे . शासन वा लोक प्रतिनिधींकडूनही अजून स्पष्ट भूमिका दिसत नाही . मात्र जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे यांनी शेतकऱ्यांनी वीज बील भरण्याबाबत स्पष्ट भूमिका घेत शेतकऱ्यांना सकारात्मक विचार करून चालु वीज बील भरण्याबाबत आवाहन केले आहे. चालु वर्षी पाऊस चांगला झाल्याने अतिवृष्टी मूळे काही पिकांचे नुकसान झाले असले तरी मका व ऊसासारखी पिके जोमात आलेली होती . करमाळा तालुक्यातील ऊसाचे बऱ्यापैकी गाळप झाले आहे व चार पैसे शेतकऱ्यांकडे आलेले आहेत . रब्बीची पिके सध्या जोमात आहेत . सध्या थंडी कमी होवून ऊन वाढायला लागल्याने पिकांची वाढ होण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे . त्यातच एम .एस .ई.बी . ची उप कंपनी असलेल्या एम एस इ डी सी एल ने वीज कनेक्शन कट केल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत . जरी अडचणी असल्या तरी शेतकऱ्यांनी चालु देयक भरण्याबाबत सकारात्मकता दाखवावी कारण आपण भरलेल्या पैश्यांवरच विदयुत मंडळांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी व इतर खर्च केला जातो . एक तर या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते . तसेच सध्या म राज्य .विद्यूत वितरण कंपनी ही एमएसईबी या महामंडळा अंतर्गत येते . जर आपण चालु वीज देयक भरले नाही . तर ही कंपनी आधीच तोट्यात असल्याने एक दिवस कायमची बंद होईल अन् शेवटी या कंपनीचे खासगीकरण होईल अन् खासगी कंपन्याकडून शेतकऱ्यांची लुट सुरु होईल . हा मोठा धोका टाळण्यासाठी बळीराजानी सकारात्मक पाऊल उचलुन चालु वीज बील भरुन एम एस इ डी सी एल कंपनीला सहकार्य करावे व सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वीज बील रिकव्हरी च्या बाबत करमाळा तालुक्याचे नाव व्हावे असे आवाहन शंभूराजे जगताप यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले आहे . ते पूढे बोलताना म्हणाले की करमाळा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सांगितलेल्या सर्व अडचणी वेळो -वेळी सोडवल्या आहेत हा माझा स्वतः चा अनुभव आहे . अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .
Comments
Post a Comment