करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर
करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. करमाळा नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर अनुसूचित जाती महिलांसाठी २ व सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गुरुवारी (ता. १०) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला असून यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत.
अशी आहे प्रारूप प्रभाग रचना :
*प्रभाग क्रमांक 1* : लोकसंख्या २५१७, अनुसूचित जाती ३८७, अनुसूचित जमाती ३७. प्रभागाची व्यप्ती : कानडे वस्ती, सुमंतनगर, कुंभारवाडा, किल्ला वेस, मोहल्ला. प्रभागाची सीमा : उत्तर : कानडे वस्ती ते पूर्वेकडील नालबंद वस्ती, ओढा ते नगरपालिका हद्द. पूर्व : नालबंद वस्ती ओढा, नगरपालिका हद्द ते मार्केट यार्ड कंपाऊंड पश्चिम बाजू, राहुल सावंत घर ते वांगडे बोळीतून मोकने सर घर ते सुशील वनारसे घर. दक्षिण : सुशील वनारसे ते नंदू चिवटे दुकान ते नारायण जाधव घर ते किल्ला तटबंदी उत्तर बाजूने संभाजी नगर भिसे घर ते सुमंतनगर, सांगळे सर घर पर्यंत. पश्चिम : सुमंतनगर सांगळे सर घर ते रामा ढाणे वस्ती ते कानडे वस्ती.
----‐-----------------------------------
*प्रभाग क्रमांक 2* : लोकसंख्या २१९१, अनुसूचित जाती १०९, अनुसूचित जमाती ०. प्रभागाची व्यप्ती : हिरडे प्लॉट, सावंत गल्ली, मार्केट यार्ड मोहिद्दीन तालीम, वेताळ पेठ उत्तर बाजू, मेन रोड, पोथरे नाका, घोडेपीर मैदान.
प्रभागाची सीमा : उत्तर : नवीन बायपास नगरपालिका हद्द ते पूर्वेकडे जामखेड रस्ता ते दक्षिणेकडे हिरडे प्लॉटचे उत्तर बाजूने नवीन बायपास पूर्वेकडे नगरपालिका हद्द.
पूर्व : पूर्वेकडील नगरपालिका हद्दपासून दक्षिणेकडे गट नं. ११३ व ११७ ते निलज रोडने पश्चिमेकडे जुना बायपास रोडने भलानी घर ते भद्री क्षीरसागर घर ते दक्षिणेकडे शियाळ दुकान व प्रकाश यादव घर ते घाडगे वकील घर ते पूर्वेकडे किरण बोकन घर ते दक्षिणेकडे बारामती सहकारी बँक.
दक्षिण : बारामती सहकारी बँक ते घोडेपीर मैदान सूळ घर ते रणछोडदास शहा किराणा दुकान ते उत्तरेकडे वर्धमान मेडिकल ते पश्चिमेकडे वेताळ पेठ उत्तर बाजूने रामाचा हौद.
पश्चिम : रामाचा हौद ते उत्तरकडे मोहल्ला गल्ली ते पूर्वेकडे रफीक शेख घर ते उत्तरेकडे विजय सावंत घर ते अमर सूर्यवंशी घर ते मार्केट यार्ड कंपाऊंड ते नगर रोड स्मशानभूमी ते उत्तरेकडे बायपास रोड ते करमाळा नगरपालिका हद्द.
---‐------------------------------------
*प्रभाग क्रमांक 3* : लोकसंख्या 2190, अनुसूचित जाती 91 अनुसूचित जमाती ० :प्रभागाची व्यप्ती : मंगळवार पेठ, जुना बायपास रोड, मेन रोड, गुजर गल्ली, नगरपालिका दवाखाना परिसर, रावळ गल्ली, भवानी पेठ, दत्त पेठ उत्तर.
प्रभागाची सीमा : उत्तर : रमणभाईचंद दोशी घर ते जुना बायपास रोडने पूर्वेकडे आरक्षण क्रमांक सात भाजी मंडई ते निलज रोड नाला पूल.
पूर्व : निलज रोड नाला ते दक्षिणेकडे गट नंबर 190 व २०० ते ढेपे बोळ उत्तर बाजू त्रिबके घर ते प्रमोद चांदगुडे घर ते राजेंद्र मांगले घर ते रमेश पवार घर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
दक्षिण : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिंगाडे घर ते डॉक्टर महाजन ते सुभाष चौक तांबोळी दुकान.
पश्चिम : सुभाष चौक तांबोळी दुकान ते उत्तरेकडे मेन रोड ते मोहोळकर फुलाचे दुकान ते सुकळी कापड दुकान ते काझी बोळातून उपाध्य घर ते माळवे घर ते उत्तरेकडे महाराणा प्रताप पुतळा ते कोठडिया दुकान ते देवडीकर घर ते उत्तरेकडे रमनभाईचंद घर.
----------------------------------------
*प्रभाग क्रमांक 4* : लोकसंख्या 2511,अनुसूचित जाती 158, अनुसूचित जमाती 28 : प्रभागाची व्यप्ती : चांदगुडे गल्ली, कुंभार प्लॉट, कृष्णाजी नगर, गणेश नगर, फंड गल्ली, दत्त पेठ दक्षिण बाजू.
प्रभागाची सीमा : उत्तर : राजेंद्र ढेपे घर ते रवी क्षिरसागर ते पूर्वेकडे डॉक्टर व्हटकर हॉस्पिटल पिछाडी ते दक्षिण बाजूने नवीन बायपास ते गट नंबर २०५ ते नगरपालिका हद्दपर्यंत.
पूर्व : नगरपालिका हद्द ते गट नंबर 205 ते एमएसईबी सब स्टेशन ते सिटीसर्वे ३९८२ ते नगरपालिका हद्द.
दक्षिण : सिटी सर्वे ३982 ते नगरपालिका हद्द जुने पांडे रस्ता उत्तर बाजूने नगरपालिका ट्रॅफिक आयर्लंड.
पश्चिम : नगरपालिका ट्रॅफिक आयर्लंड राम क्षीरसागर घर ते कल्याण फंड घर ते हनुमंत फंड घर ते दत्तपेठ अनिल पाटील घर ते पुर्वेकडून राज व्हिडिओ ते शंकर माने घर ते डॉ. नेटके हॉस्पिटल गाडवे घर ईश्वर चांदगुडे घर ते राजेंद्र ढेपे घर.
----------------------------------------
*प्रभाग क्रमांक 5*: लोकसंख्या 2295, अनुसूचित जाती 86, अनुसूचित जमाती 44 : प्रभागाची व्यप्ती : फंड गल्ली, सुतार गल्ली, मेन रोड, कसबा गल्ली, कानाड गल्ली, पुणे रोड उत्तर बाजू.
प्रभागाची सीमा उत्तर : सुभाष चौक भाई भाई पान मर्चंट ते दत्त पेठ दक्षिण बाजू नितीन मशनरी.
पूर्व : नितीन मशनरी ते फंड गल्ली विश्वनाथ भणगे घर ते झाकणे घर ते पोळ घर ते निर्गुनकर घर ते जुना बायपास बागवान घर.
दक्षिण : जुना बायपास बागवान घर ते संगम टी हाऊस ते पुणे रोड मटन मार्केट ते रहीमतुला खान गॅरेज.
पश्चिम : रहीमतुला खान गॅरेज ते मारुती मंदिर ते नामदेव गायकवाड घर ते सुभाष राखुंडे घर ते माकुडे घर डॉ. परदेशी हॉस्पिटल ते बागवान घर ते जुनी बँक ऑफ इंडिया ते सुभाष चौक भाई पान मर्चंड.
---------------------------------------
*प्रभाग क्रमांक 6* : लोकसंख्या 2263, अनुसूचित जाती 534, अनुसूचित जमाती १० : प्रभागाची व्याप्ती : वेताळ पेठ दक्षिण बाजू, मेन रोड, राशीन पेठ उत्तर बाजू, अण्णाभाऊ साठे नगर, खडकपुरा, कुंकू गल्ली.
प्रभागाची सीमा : उत्तर : राम मंदिर ते फुलसुंदर चौक शब्बीर तांबोळी पान दुकान.
पूर्व : शब्बीर तांबोळी पान दुकान ते मेन रोड ते महात्मा गांधी चौक ते सुभाष चौक चंदू हलवाई दुकान.
दक्षिण : सुभाष चौक चंदू हलवाई दुकान ते राशिन पेठ डॉ. भांबळ कोपरा.
पश्चिम : डॉ. भांबळ कोपरा ते खडकपुरा गणेश शिंदे दुकान ते उत्तरेकडे रामाचे मंदिर.
----------------------------------------
*प्रभाग क्रमांक 7* : लोकसंख्या 2483, अनुसूचित जाती 779, अनुसूचित जमाती 211 : प्रभागाची व्यप्ती : राशिन पेठ दक्षिण बाजू, कानाड गल्ली, पेट्रोलपंप परिसर, भीमनगर, खंदक रोड, महात्मा गांधी हायस्कूल, किल्ला वेस.
प्रभागाची सीमा : उत्तर : किल्ला वेस, इस्माईल मुलाणी दुकान ते पूर्वेकडे ऍड. हिरडे ऑफिस.
पूर्व : ऍड. हिरडे ऑफिस ते दक्षिणेकडे मुकुंद कांबळे घर जगताप मॅडम घर ते राशीन पेठ लक्ष्मण कांबळे दुकान ते पूर्वेकडे दक्षिण बाजूने सुभाष चौक धनु चिवटे दुकान ते नगरपालिका शाळा नंबर 2.
दक्षिण : नगरपालिका शाळा नंबर 2 ते पश्चिमेकडे बलभीम राखुंडे घर ते बाबा माने घर ते रामचंद्र बागवान राखुंडे घर ते पश्चिमेकडे नगरपालिका शंकरराव मोहिते- पाटील शॉपिंग सेंटर ते महात्मा गांधी विद्यालय चौक.
पश्चिम : महात्मा गांधी विद्यालय चौक ते उत्तरेकडे किल्ला तटबंदी सिद्धार्थ नगर तालीम ते नगरपालिका शॉपिंग सेंटर किल्ला वेस इस्माईल दुकान.
------------------------------------
*प्रभाग क्रमांक 8*: लोकसंख्या २११९, अनुसूचित जाती 114, अनुसूचित जमाती 28 : प्रभागाची व्याप्ती : किल्ला विभाग, रंभापूरा, माने प्लॉट, जाधव प्लॉट, सुमंतनगर पश्चिम बाजू झोपडपट्टी.
प्रभागाची सीमा : उत्तर : कर्जत रोड सिटी सर्वे नंबर 3945 ते रावगाव नाका ते दक्षिणेकडे केशव विहीर समोरून लोहार वेस, किल्ला तट मार्गे संभाजी जगताप घर ते रावसाहेब कांबळे घरासमोरील जिल्हा तट कोपरा.
पूर्व : रावसाहेब कांबळे घरासमोरील किल्ला तट कोपरा ते दक्षिणकडे किल्ला तटाने जुने मुख्याधिकारी निवासस्थान ते टाऊन हॉल ते प्रेमाचा चहा कॉर्नर.
दक्षिण : प्रेमाचा चहा कॉर्नर ते पूना रोड उत्तर बाजूने केतुर नाका ते सुभाष माने घर ते करमाळा नगरपालिका हद्दपर्यंत.
पश्चिम : पुणे रोड नगरपालिका हद्द ते उत्तरेकडे कर्जत रोड सिटी सर्वे नंबर 3945.
--------------------------------------
*प्रभाग क्रमांक 9* : लोकसंख्या 2124, अनुसूचित जाती 201, अनुसूचित जमाती 49 : प्रभागाची व्यप्ती : पुणे रोड समोरील झोपडपट्टी, शॉपिंग सेंटर, पोलिस लाईन, तहसील कार्यालय, विद्यानग,र कॉटेज हॉस्पिटल, शिवाजीनगर घोलप नगर, महेंद्र नगर, देशभक्त नामदेवराव जगताप शॉपिंग सेंटर, एसटी स्टँड समोरील शॉपिंग सेंटर.
प्रभागाची सीमा : उत्तर : पुणे रोड नगरपालिका कार्यालयासमोरील मच्छिंद्र जाधव घर पूर्वेकडे नुरानी मशीद ते एमएसईबी कार्यालय ते राम मारडकर घर गंगा जमुना स्वामीमिल ते पूर्वेकडे आनंद बाग ते सिटी सर्वे नंबर 3986.
पूर्व : सिटी सर्वे नंबर ३986 ते दक्षिणेकडे नवीन बायपास रोड नगरपालिका हद्द ते पश्चिमेकडे डॉ. सारंगकर हॉस्पिटल ते ब्रह्मा मार्बल ते जेऊर रोड ते डाक बंगला रोडपर्यंत.
दक्षिण : जेऊर रोड डाक बंगला उत्तर बाजूने नाना नानी पार्कपर्यंत.
पश्चिम : नाना नानी पार्क ते नवीन कोर्टमार्ग ते उत्तरेकडे पोलिस लाईन उपविभागीय अधिकारी कार्यालय ते पुणे रोड नगरपालिका कार्यालय समोरील मच्छिंद्र जाधव घर.
----‐-----------------------------------
*प्रभाग क्रमांक 10*: लोकसंख्या 2506, अनुसूचित जाती 1076, अनुसूचित जमाती 23 : प्रभागाची व्याप्ती : सिद्धार्थनगर, नगरपालिका कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद विश्रामगृह बीअँडसी विश्रामगृह, मौलालीमाळ, सात विहीर परिसर, मुथ्था प्लॉट.
प्रभागाची सीमा : उत्तर : पुणे रोड नगरपालिका हद्द मुद्दा प्लॉट ते पूर्वेकडे संभाजी जगताप घर.
पूर्व : संभाजी जगताप घर ते दक्षिणेकडे सिद्धार्थनगर ते दक्षिणेकडे सात विहीर ते पूर्वेकडे बीअँडसी रेस्ट हाऊस ते जेऊर रोड ते दक्षिणेकडे जेऊर रोडने मौलालीमाळ नगरपालिका हद्दीपर्यंत.
दक्षिण : जेऊर रोड नगरपालिका हद्द ते पश्चिमेकडे नगरपालिका हद्दपर्यंत.
पश्चिम : पश्चिमेकडील नगरपालिका हद्द ते उत्तरेकडे पुणे रोड नगरपालिका हद्द मुथ्था प्लॉट.
Comments
Post a Comment