Posts

*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात

Image
*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात* करमाळा दि.25 प्रतिनिधी. माता रमाई जयंती, संत रविदास महाराज जयंती व लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांचे वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैध्द मातंग चर्मकार ऐक्य परिषदेसाठी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते नेणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे.    ही परिषद 26 फ्रेब्रुरवारी 2023 रोजी रात्री सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे होणार आहे. या परिषदेचे उदघाटन सोलापूरचे विचारवंत प्रा.डॉ. संघप्रकाश दुड्डे यांच्या हस्ते तर परिषदेचे अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय आध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.  या परिषदेच्या विद्वान, कर्तुत्ववान, माणसे नसले तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवी, विद्येचा तुडवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सोलापूर, १४ जाने. १९४६) एक गंभीर चर्चा या विषयासह इतर महत्वाच्या...

युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.

Image
युवानेते शंभूराजे जगताप यांची शेती पंपाच्या वीजबील भरण्यासंदर्भात  स्पष्ट भूमिका..... [ वीज बील भरले नाही तर भविष्यातील एमएसईबी च्या खासगीकरणाचा खूप मोठा धोका आहे तो धोका टाळण्यासाठी व वीज आठ तास - दहा तासा ऐवजी अखंड मिळवण्या साठी शेतकऱ्यांनी नियमीत वीज बील भरण्याची सवय लावून घेतली पाहीजे]                       सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्र विद्यूत वितरण कंपनी कडून चालु वीज देयक भरण्या संदर्भात निघालेल्या फतव्या मुळे व विज कनेक्शन तोडणी मोहीम चालु झाल्या मुळे बील भरण्या संदर्भात बळीराजा संभ्रमावस्थेत आहे . शासन वा लोक प्रतिनिधींकडूनही अजून स्पष्ट भूमिका दिसत नाही . मात्र जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे यांनी  शेतकऱ्यांनी वीज बील भरण्याबाबत स्पष्ट भूमिका घेत शेतकऱ्यांना सकारात्मक विचार करून चालु वीज बील भरण्याबाबत आवाहन केले आहे. चालु वर्षी पाऊस चांगला झाल्याने अतिवृष्टी मूळे काही पिकांचे नुकसान झाले असले तरी मका व ऊसासारखी पिके जोमात आलेली होती . करमाळा तालुक्यातील ऊसाचे बऱ्यापैकी गाळप झाले...

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 21 जोडपी विवाह बंधनात*

Image
*करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 21 जोडपी विवाह बंधनात* करमाळा - श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा येथे शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता गोरज मुहूर्तावर श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळा पार पडला यामध्ये  21 जोडपी विवाह बंधनात अडकली,  या विवाह सोहळ्यातील वर राजाची शहरातील घोड्यावरील मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, या विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब उपस्थित होते ,शुभाशीर्वाद देताना जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला- मुलींची लग्न लावून देऊन श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक चळवळीला बळ द्यावे तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या अशा सामाजिक कार्याला आमच्या नेहमी शुभेच्छा व सहकार्य राहील असे प्रतिपादन केले,  या विवाह सोहळ्यातील नव वधू-वरांना पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे जावे यासाठी  ॲड. गजानन भाकरे यांनी...

आज न्यू इरा इंग्लिश मिडियम स्कूल करमाळा या ठिकाणी 74 व्या प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
आज न्यू इरा इंग्लिश मिडियम स्कूल करमाळा या ठिकाणी 74 व्या  प्रजासत्ताक दिना निमित्त रेहनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष/मार्गदर्शक हाजी कलीम अब्दुल रशीद काझी(सर)यांच्या हस्ते ध्वजावतरण  करण्यात आला व रहेनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याचा व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान रेहनुमा संस्थेच्या च्या वतीने ट्राफी व प्रमाणपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कलीम काझी सर यांचे हस्ते देण्यात आले . 1]अलनिसार गयासुद्दीन पठान [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल] 2]फरहान शमशोद्दीन शेख [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल] 3]जुनेद शमशोद्दीन शेख [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सिल्वर मेडेल ] 4]साहिल जहागिर शेख (राजस्तरिय कब्बडी स्पर्धेत गोल्ड मेडल] या खेळाडुचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला  मा.नगराअध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शौकत नालबंद, न्यू इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष  अजीम हैदरबेग मोगल  मौलाना मोहसिन शेख,,मुस्तकीम पठान,,सादीक नालबंद,,जमिर सय्...

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार

Image
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे लोकशाही संविधान होय असे मत मातंग एकता आंदोलनाचे करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी व्यक्त केले, रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे जगाला तारू शकते नको राजे शाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही असे त्यांनी यावेळी उद्गार काढले तसेच बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी असेही त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आधारित ग्र...

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

Image
*करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन* करमाळा - करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,  पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वर मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत , पुढे जाऊन याचे रूपांतर  कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे, याचाच विचार करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात - भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5  वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहोत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो, या विवाह सोहळ्याचे आयोजन क...

आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले.

Image
आम आदमी पार्टी करमाळा    यांच्याकडून  आज दिनांक -05/12/2022 रोजी राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर नऊ मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना माननीय तहसीलदार श्री समीर माने साहेब यांच्यामार्फत देण्यात आले.              याप्रसंगी श्री आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शिंदे , मा. उपसरपंच , पोथरे , श्री विजय थोरात , उपसरपंच , वडगाव , श्री शंकर कुलकर्णी ,करमाळा आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा संघटक श्री अमोल जाधव, करमाळा , श्री दत्तात्रय काटकर , करमाळा , श्री बबन खटके पोथरे , इत्यादी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.