करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

*करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन*

करमाळा - करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली, 
पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वर मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत ,
पुढे जाऊन याचे रूपांतर  कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे, याचाच विचार करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे,
आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात - भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5  वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहोत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो,
या विवाह सोहळ्याचे आयोजन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी  गोरज मुहूर्तावर सायंकाळी 6:00 वाजता करण्यात आले आहे ,
या पत्रकार परिषदेला श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व संचालक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर