भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार   
               
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे लोकशाही संविधान होय असे मत मातंग एकता आंदोलनाचे करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी व्यक्त केले, रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे जगाला तारू शकते नको राजे शाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही असे त्यांनी यावेळी उद्गार काढले तसेच बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी असेही त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आधारित ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र शिंदे, मधुकर पवार ,राऊत गुरुजी, वैशाली महाजन ,प्रिया वीर, विद्या गंभीर, निर्मला पाटोळे ,चव्हाण मॅडम राहूल पवार, प्रकाश कांबळे, आल्हाट व शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर