Posts

आज न्यू इरा इंग्लिश मिडियम स्कूल करमाळा या ठिकाणी 74 व्या प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
आज न्यू इरा इंग्लिश मिडियम स्कूल करमाळा या ठिकाणी 74 व्या  प्रजासत्ताक दिना निमित्त रेहनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष/मार्गदर्शक हाजी कलीम अब्दुल रशीद काझी(सर)यांच्या हस्ते ध्वजावतरण  करण्यात आला व रहेनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याचा व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान रेहनुमा संस्थेच्या च्या वतीने ट्राफी व प्रमाणपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कलीम काझी सर यांचे हस्ते देण्यात आले . 1]अलनिसार गयासुद्दीन पठान [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल] 2]फरहान शमशोद्दीन शेख [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल] 3]जुनेद शमशोद्दीन शेख [राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सिल्वर मेडेल ] 4]साहिल जहागिर शेख (राजस्तरिय कब्बडी स्पर्धेत गोल्ड मेडल] या खेळाडुचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला  मा.नगराअध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शौकत नालबंद, न्यू इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष  अजीम हैदरबेग मोगल  मौलाना मोहसिन शेख,,मुस्तकीम पठान,,सादीक नालबंद,,जमिर सय्...

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार

Image
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे लोकशाही संविधान होय असे मत मातंग एकता आंदोलनाचे करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी व्यक्त केले, रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे जगाला तारू शकते नको राजे शाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही असे त्यांनी यावेळी उद्गार काढले तसेच बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी असेही त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आधारित ग्र...

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

Image
*करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन* करमाळा - करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,  पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वर मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत , पुढे जाऊन याचे रूपांतर  कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे, याचाच विचार करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात - भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5  वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहोत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो, या विवाह सोहळ्याचे आयोजन क...

आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले.

Image
आम आदमी पार्टी करमाळा    यांच्याकडून  आज दिनांक -05/12/2022 रोजी राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर नऊ मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना माननीय तहसीलदार श्री समीर माने साहेब यांच्यामार्फत देण्यात आले.              याप्रसंगी श्री आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शिंदे , मा. उपसरपंच , पोथरे , श्री विजय थोरात , उपसरपंच , वडगाव , श्री शंकर कुलकर्णी ,करमाळा आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा संघटक श्री अमोल जाधव, करमाळा , श्री दत्तात्रय काटकर , करमाळा , श्री बबन खटके पोथरे , इत्यादी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम

Image
*आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम* करमाळा दि. 1 प्रतिनिधी बामसेफच्या 39 व्या व भारत मुक्ती मोर्चाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत तसेच 6 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील आरएसएस हेडकॉटरवर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी काढलेल्या प्रोटेस्ट मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मा. वामनजी मेश्राम साहेब यांचा जाहीर सत्कार व त्या निमित्ताने करमाळा येथे आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय जाहीर प्रबोधन संमेलनावेळी वामन मेश्राम आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या संमेलनापूर्वी आरपीआय चे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ मेश्राम यांचा भव्य सत्कार केल्या नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये हजारों लोक सहभागी झाले होते. यावेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  राजेग्रुप रंभापुरा, बहुजन मुक्ती पार्टी,जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, कुर्डुवाडीचे जाफर शेख आणि वि...

बहुजन विकास संस्थेकडून समाज हिताचे कार्य : ऍड. नईम काझी*

Image
*बहुजन विकास संस्थेकडून समाज हिताचे कार्य : ऍड. नईम काझी* करमाळा दि. २८  प्रतिनिधी  करमाळा येथील न्यू इरा इंग्लीश स्कूल येथे बहुजन विकास संस्थेमार्फत लेजर खतना कॅम्पचे आयोजित करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमा प्रसंगी उद्घाटक ऍड. नईम काझी बोलत होते. या  खतना कॅम्पमध्ये ४१ मुलांची खतना सोलापूरचे सुप्रसिद्ध खतना स्पेशालिस्ट डॉ. नसीर सय्यद यांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना मोहसीन शेख, मौलाना तोहीद शेख, हाफिज अन्वर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी पुढे बोलताना ऍड. काझी म्हणाले कि, खतना हि इस्लाम धर्मातील प्रमुख सुन्नत आहे. ती करण्यासाठी प्रत्येकाला सोलापूर या ठिकाणी जावे लागते. त्यात सर्वसामान्य लोकांना मोठा खर्च येतो. परंतु बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण यांनी लेजर खतना कॅम्पचे आयोजित करून लोकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुजन विकास संस्थेमार्फत वेळोवेळी समाज हिताचे कार्य निरंतरपणे चालू असते अशा समाज हिताचे कार्य लोकसहभागातून  करण्याची गरज असल्याचे मत काझी यांनी सांगितले....

कुमारभैय्या माने यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाला.

Image
करमाळा:- कुमारभैय्या माने यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाला. यामध्ये कानाड गल्ली येथील वाल्मिकी मित्र मंडळ व कुमारभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. या रक्तदान शिबिराचे संकलन श्रीकमलाभवानी ब्लड सेंटर यांनी केले.या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले. याशिवाय श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून  गरजू व निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले. याशिवाय वर्षभरही इतर सामाजिक उपक्रम राबवण्याचा निश्चिय त्यांनी यावेळी केला आहे. कुमारभैय्या माने हे  नगरसेविका राजश्री दत्तात्रय माने यांचे चिरंजीव आहेत. कानाड गल्लीसह करमाळा शहरात होणाऱ्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. यावर्षी त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान व अन्नदान करून वाढदिवस साजरा केला आहे. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. माने यांनी यापूर्वी करमाळा नगरपालिकेतील कामगारांचा महिला दिनावेळी सन्मान केला होता.   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ व कुमारभैय्या माने मित्रपरिवाराचे सर्व सदस्यां...