आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम

*आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम*

करमाळा दि. 1
प्रतिनिधी

बामसेफच्या 39 व्या व भारत मुक्ती मोर्चाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत तसेच 6 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील आरएसएस हेडकॉटरवर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी काढलेल्या प्रोटेस्ट मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मा. वामनजी मेश्राम साहेब यांचा जाहीर सत्कार व त्या निमित्ताने करमाळा येथे आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय जाहीर प्रबोधन संमेलनावेळी वामन मेश्राम आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

या संमेलनापूर्वी आरपीआय चे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ मेश्राम यांचा भव्य सत्कार केल्या नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये हजारों लोक सहभागी झाले होते.
यावेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  राजेग्रुप रंभापुरा, बहुजन मुक्ती पार्टी,जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, कुर्डुवाडीचे जाफर शेख आणि विविध समविचारी पक्ष, संघटनांनच्या वतीने मेश्राम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

या संमेलनास उद्घाटक म्हणून आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मेश्राम म्हणाले की, गरिबी निर्मूलनासाठी  सरकारने विविध योजना, बजेट, महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा मध्यम आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ज्या समाजाचे पर्याप्त प्रतिनिधित्व शासन, प्रशासनात नाही त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी संविधानामध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. असे असे असताना सरकारने सवर्णांच्या गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली  इडब्लूएस आरक्षण मंजूर करून 
असंवैधानिकरित्या काम केले आहे. एकीकडे ओबीसीसाठी पन्नास टक्केची मर्यादा घालून बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले आहे, आणि दुसरीकडे सवर्णांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त शासन प्रशासनात पर्याप्त प्रतिनिधित्व असून इडब्लूएसच्या माध्यमातून आणखी दहा टक्के जास्तीचे आरक्षण दिले आहे. हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे. 
असंवैधानिक इडब्लूएस आरक्षण त्वरित रद्द करावे अन्यथा त्या विरोधात आम्ही आंदोलन उभारू असा इशारा यावेळी मेश्राम यांनी दिला.

यावेळी डी आर ओहोळ, ऍड राहुल मखरे, नागेश कांबळे, ऍड. तुकाराम राऊत, मौलाना मोहसीन शेख, गणेश करे पाटील, संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, प्रा. डॉ. मनोजकुमार माने, विक्रमसिंह काटुळे, सुधाकर आवटे, ऍड. भास्कर पवार, भाऊसाहेब कांबळे, दिनेश माने आदी मान्यवरांनी विचार मांडले.

 यावेळी प्रबोधन संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद आणि दीपक ओहोळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना मोहसीन शेख, संभाजी ब्रिगेड चे नितीन खटके, महिला विंगच्या राज्य प्रभारी उषा थोरात, बहूजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, भाई राजू मगर, आनंद काशीद, भटके विमुक्त संघटनेचे सुखदेव चव्हाण, मातंग समाज संघटनेचे युवराज पवार, पारधी समाज संघटनेचे अनिल चव्हाण, जिल्हापरिषदचे अभियंता इंजि. सागर नागणे, सामजिक कार्यकर्ते किशोर थोरे, प्रशांत कांबळे, मल्लिनाथ बनसोडे, अजीज नदाफ, सुधाकर आवटे, डॉ. भारत पवार, बी.के. गायकवाड, कुमार लोंढे, शांतीलाल बागवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संमेलनाचे प्रास्तविक आर. आर. पाटील यांनी केले तर जनआंदोलन निर्माण निधीची घोषणा कय्युम शेख यांनी केली. सूत्रसंचालन कल्पेश कांबळे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बोराडे यांनी मानले. 

सदर प्रबोधन संमेलन यशस्वी करण्यासाठी करमाळा व जिल्हा युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर