कुमारभैय्या माने यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाला.
करमाळा:- कुमारभैय्या माने यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाला. यामध्ये कानाड गल्ली येथील वाल्मिकी मित्र मंडळ व कुमारभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. या रक्तदान शिबिराचे संकलन श्रीकमलाभवानी ब्लड सेंटर यांनी केले.या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले. याशिवाय श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून गरजू व निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले. याशिवाय वर्षभरही इतर सामाजिक उपक्रम राबवण्याचा निश्चिय त्यांनी यावेळी केला आहे.
कुमारभैय्या माने हे नगरसेविका राजश्री दत्तात्रय माने यांचे चिरंजीव आहेत. कानाड गल्लीसह करमाळा शहरात होणाऱ्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. यावर्षी त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान व अन्नदान करून वाढदिवस साजरा केला आहे. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. माने यांनी यापूर्वी करमाळा नगरपालिकेतील कामगारांचा महिला दिनावेळी सन्मान केला होता.
Comments
Post a Comment