Posts

जिल्हा परिषद,न.प., ग्रा.पं. निवडणूका फेब्रुवारी पुर्वी होणार? निवडणूका आयोगाची तयारी सुरू

Image
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे निवडणूका कधी लागणार याकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे डोळे लागले आहेत. परंतु आताही प्रतिक्षा संपणार असे दिसत असून तीन टप्प्यात व फेब्रुवारी महिन्या पुर्वी निवडणूका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे वृत्त आहे. राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषदांची मुदत संपली असल्याने सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली तर आणखी काही ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. यापुर्वीच जि.प. न.प. ची निवडणूकीची तयारी सुरू झाली होती. यासाठी प्रभाग व‌ गट,गणांची रचना झाली आहे. परंतु सत्ता बदला नंतर या निवडणूका पुढे ढकलून प्रशासक नेमण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर कधी होणार याची राजकीय पक्ष व इच्छुकांना प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत असून, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात निवडणूक आयोग जि.प., न‌.प. व ग्रामपंचायत निवडणूका तीन टप्प्यात घेणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. फेब्रुवारी नंतर १०,१२ सह इतर परिक्षा असतात. यानंतर कडाक्याचे उन असतं यामुळे फेब्रु...

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आमरण उपोषण करते दत्ता पाटील यांना जाहीर पाठिंबा .

Image
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आमरण उपोषण करते दत्ता पाटील यांना जाहीर पाठिंबा .         आझाद मैदान मुंबई येथे दत्ता पाटील हडसनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड हे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मराठा समाज बांधव व बहुजन बांधव उपस्थित मोठ्या संख्येने होता. यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी विनायक रावजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहून यावेळी मराठा आरक्षण पाठिंबाचे निवेदन देण्यात आले . तसेच मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा त्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला  समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार मागणी व घोषणा उपस्थिततांकडून देण्यात आल्या व दत्ता पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत प्रकृती खालवत चाललेलि असून त्यांचे जर काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जबाबदार असतील असंही या निवेदनामध्ये मनले आहे. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आजाद भाई शेख. ...

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेबाबत योग्य तो निर्णय व्हावा÷ युवराज जगताप

Image
करमाळा प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती  दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे . साहित्य आणि समाजकारणात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे विशेष योगदान आहे.मागास मातंग समाजातून पुढे आलेल्या अण्णाभाऊनी वंचित समाजाच्या व्यथा , वेदना आपले साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परीणामकार रित्या मांडल्या अशा या थोर समाज सुधारकास भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास त्यांच्या कार्याला साजेल असे कार्य घडणार आहे . अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा  अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले. तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, ...

श्री जैन प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

Image
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ जुलै २०२२ रोजी रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ९० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. या करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? कोणते करिअर विद्यार्थ्यांनी निवडावे, त्यासोबतच दहावीनंतर व्यावसायिक शिक्षणाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचा पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला तशा प्रकारचे प्रतिसादही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आमच्या कॉलेजकडे नोंदवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ जुलै २०२२ रोजी रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉ...

ओबीसी आरक्षण निकालाचे करमाळा भाजपकडून स्वागत*

Image
*ओबीसी आरक्षण निकालाचे करमाळा भाजपकडून स्वागत* करमाळा -  करमाळा भाजपाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात जो ओबीसींच्या बाजूने निकाल दिला ,त्याचे स्वागत भाजपा संपर्क कार्यालय या ठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केले , यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे  म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो सोडविण्यासाठी बांठीया  आयोगाची नेमणूक करण्यात आली, त्या आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर इम्पेरिकल डेटा सादर केला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे,  यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, शिवसेना माजी तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,चेअरमन दासाबापू बर्ड...

मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अन्नदान*

Image
*मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अन्नदान* करमाळा - येथील मातंग समाजाचे नेते समाज्याच्या साठी रात्रीचा दिवस करून समाज्याच्या  न्याया हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता  मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचा ढाण्यावाघ माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांचे कट्टर समर्थक स्व.नामदेव विष्णू जगताप यांचे दि.१२ जुलै सहावे पुण्यस्मरणा निमित्त करमाळा प्रतिमेस पुजन करून वृद्ध गृहस्थाना अन्नदान जेवण दिले. स्व.नामदेव जगताप हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालीय साहित्य वाटप रूग्णालयात फळे चादर वाटप दरसाल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त असा स्व.नामदेव जगताप हे मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , काँग्रेस पक्षात त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले. दि.12 जुलै रोजी सहाव्या पुण्यस्मरणा स्व.नामदेव जगताप युवा मंच व मातंग एकता आंदोलन करमाळा...

करमाळा टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे होत असलेल्या अपघाताबाबत शंभुराजे जगताप यांनी दिला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा.

Image
*करमाळा टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे होत असलेल्या अपघाताबाबत युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी मा.उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा यांना निवेदन दिले.  करमाळा- टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे वारंवार रहदारीमुळे अनेक अपघात झाले असून यात जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांनी आपले जीव गमावले आहेत.  याची लवकरात लवकर दखल घेण्यासाठी शंभूराजेंनी त्यांना निवेदन केले यावर लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर शंभूराजेंनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला आहे. यादरम्यान बिटरगाव चौकात अपघात झाला तर याला सर्वस्व संबंधित अधिकारी व संबंधित विभाग राहील.