मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अन्नदान*

*मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अन्नदान*

करमाळा - येथील मातंग समाजाचे नेते समाज्याच्या साठी रात्रीचा दिवस करून समाज्याच्या  न्याया हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता  मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचा ढाण्यावाघ माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांचे कट्टर समर्थक स्व.नामदेव विष्णू जगताप यांचे दि.१२ जुलै सहावे पुण्यस्मरणा निमित्त करमाळा प्रतिमेस पुजन करून वृद्ध गृहस्थाना अन्नदान जेवण दिले. स्व.नामदेव जगताप हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालीय साहित्य वाटप रूग्णालयात फळे चादर वाटप दरसाल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त असा स्व.नामदेव जगताप हे मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , काँग्रेस पक्षात त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले. दि.12 जुलै रोजी सहाव्या पुण्यस्मरणा स्व.नामदेव जगताप युवा मंच व मातंग एकता आंदोलन करमाळा तालुक्याच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेस स्व.नामदेव जगताप यांचे चिरंजीव युवराज जगताप, मातंग एकता आंदोलनचे ता.अध्यक्ष शरद भैया पवार, युवक तालुका अध्यक्ष दत्ता चव्हाण , जिल्हाउपाध्यक्ष  रतन शिंदे, प्रशांत शिंदे, अभिजीत मंडलिक,पांडुरंग जगताप, हरी जगताप, सागर सांगळे,अभिजीत पिसे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर