करमाळा टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे होत असलेल्या अपघाताबाबत शंभुराजे जगताप यांनी दिला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा.

*करमाळा टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे होत असलेल्या अपघाताबाबत युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी मा.उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा यांना निवेदन दिले.  करमाळा- टेंभुर्णी रोड वरील सांगवी फाटा येथे वारंवार रहदारीमुळे अनेक अपघात झाले असून यात जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांनी आपले जीव गमावले आहेत.
 याची लवकरात लवकर दखल घेण्यासाठी शंभूराजेंनी त्यांना निवेदन केले यावर लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर शंभूराजेंनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला आहे. यादरम्यान बिटरगाव चौकात अपघात झाला तर याला सर्वस्व संबंधित अधिकारी व संबंधित विभाग राहील.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर