सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आमरण उपोषण करते दत्ता पाटील यांना जाहीर पाठिंबा .
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आमरण उपोषण करते दत्ता पाटील यांना जाहीर पाठिंबा .
आझाद मैदान मुंबई येथे दत्ता पाटील हडसनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड हे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मराठा समाज बांधव व बहुजन बांधव उपस्थित मोठ्या संख्येने होता. यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी विनायक रावजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहून यावेळी मराठा आरक्षण पाठिंबाचे निवेदन देण्यात आले . तसेच मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा त्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार मागणी व घोषणा उपस्थिततांकडून देण्यात आल्या व दत्ता पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत प्रकृती खालवत चाललेलि असून त्यांचे जर काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जबाबदार असतील असंही या निवेदनामध्ये मनले आहे. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आजाद भाई शेख. काँग्रेस अध्यक्ष दस्तगीर पठाण सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पठाण जीशान कबीर. इम्तियाज पठाण. मंजूर शेख. पप्पू पठाण. समीर शेख. व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment