ओबीसी आरक्षण निकालाचे करमाळा भाजपकडून स्वागत*

*ओबीसी आरक्षण निकालाचे करमाळा भाजपकडून स्वागत*

करमाळा -  करमाळा भाजपाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात जो ओबीसींच्या बाजूने निकाल दिला ,त्याचे स्वागत भाजपा संपर्क कार्यालय या ठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केले , यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे  म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो सोडविण्यासाठी बांठीया  आयोगाची नेमणूक करण्यात आली, त्या आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर इम्पेरिकल डेटा सादर केला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे,
 यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, शिवसेना माजी तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,चेअरमन दासाबापू बर्डे ,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस भैयाराजे गोसावी, पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम, नवनाथ नागरगोजे, नाना अनारसे ,संजय किरवे, मनोज मुसळे, शैलेश राजमाने, विशाल घाडगे ,गणेश गोसावी ,सोमनाथ भागडे, संतोष फुंदे, शरद कोकीळ, पप्पू काळे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर