युवराज जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान
युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाढदिवस म्हणलं की आपण नेहमी डिजे, पार्ट्या ,नाच ,गाणे करतो पण युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानने घेतलेल्या अन्नदानाचा वसा पुढे नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या अन्नसंस्कार पूजेत सहभागी होऊन. आज मातंग समाज नेते स्वर्गीय नामदेव जगताप युवा मंच यांच्या वतीने मातंग समाजाचे युवा नेते युवराज भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नसंस्कार पूजेमध्ये सहभाग घेऊन गोरगरीब वृद्धांना अन्नदान करण्यात आले. युवराज जगताप युवा मंच हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप,रूग्णालयात फळे, चादर वाटप, फिरस्ती लोकांना शाल, अन्न वाटप करतात. महा पुरूषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करतात.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त युवराज जगताप हे मातंग एकता आंदोलनचे युवा अध्यक्ष व मातंग समाज नेते स...