माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तर्फे गोरगरीब जनतेला शाल व चादर वाटप
*माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तर्फे करमाळा शहरातील गोरगरीब लोकांना ब्लँकेट्स चे वाटप *
करमाळा -
माजी आमदार आणि करमाळा तालुक्याचे नेते जयवंतरावजी जगताप यांच्या तर्फे करमाळा शहरातील बस्थानाक, भाजी मंडई, मार्केट यार्ड आणि अश्या अनेक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रात्रीचे वेळी झोपणाऱ्या गोरगरीब लोकांना आज देशभक्त नामदेवरावजी जगताप शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या शुभहस्ते ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आले, जगताप यांच्या या आधारामुळे आता अनेक गरीब लोकांना थंडीपासून बचाव होणार असून या ब्लँकेट्स वाटपामुळे उघड्यावर झोपणाऱ्या गरीब लोकांना मायेची उब मिळणार आहे. पहिल्यापासूनच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर असणाऱ्या, सर्वसामान्य जनतेची कदर असणाऱ्या माजी आमदार जगताप यांचे या उपक्रमामुळे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, प्रतिष्ठित व्यापारी पिंटूशेठ गुगळे, अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र परदेशी, बोरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीराम भोगल, पत्रकार जयंत दळवी, विशाल घोलप, अविनाश जोशी, अमोल जाधव, अलीम बागवान, विपुल निंबाळकर, सुमित परदेशी, शुभम कात्रेला, भागवत वाघमारे, अंगद भांडवलकर, लक्ष्मण सरडे, हनुमंत गिरी, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment