शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे करु नये. R PRIME NEWS KARMALA
आज दि. ९/२/२०२२ बुधवार रोजी करमाळा तालुक्यांत व शहरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत लसीकरण मोहीम चालू आहे. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाने लसीकरण स्वैच्छिक आहे, लसीची सक्ती करू नये. असे आदेश दिले आहेत तरी देखील शालेय विद्यार्थ्याना लसीची सक्ती केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांची इच्छा नसेल तर त्यांना लस देवू नये. लसीमुळे बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव निर्माण झालेले आहे, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांस शालेय अधिकारी जबाबदार राहतील. यांसंबंधी मा. तहसीलदार, समीर माने यांना हे निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment