मा.आर.आर.पाटील (नाना)यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

*मा. आर. आर. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

करमाळा दि. १२ प्रतिनिधी 

बहुजन क्रांती मोर्चा करमाळा तालुका संयोजक आर. आर. पाटील यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करमाळा येथे साजरा करण्यात आला.

यावेळी बहुजनरत्न नागेशदादा कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, पत्रकार नसीर कबीर, बामसेफचे राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, प्रोटानचे जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, गजानन ननवरे, न.प. मुलांची शाळा न.१ च्या मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका सुनंदा जाधव, छत्रपती क्रांती सेनेचे बाळासाहेब तोरमल, बाबुराव पाटील, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष कय्युम शेख, न्यूज १४ चे प्रतिनिधी गणेश कांबळे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कादिर शेख, मैनुद्दीन शेख, चांद बेग, जावेद मणेरी, भारतीय बौधमहासभेचे प्रशांत कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे दिनेश दळवी, भीमराव कांबळे, बुधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे गौतम खरात, गोविद खरात, धर्मा खरात, भारतीय विध्यार्थी मोर्चाचे प्रेमकुमार सरतापे, रोहन गरड, सुरज खरात, यांच्यासह मतीन अत्तार, नईम शेख, हिंदू खाटीक संघटनेचे गजेंद्र पलंगे, सचिन ननवरे, भीमराव कांबळे सर, हनुमंत शिंदे, राहुल शिंदे, रावसाहेब जाधव, भीमराव (बाळासाहेब) कांबळे, माणिक शिंदे, रवी गोडगे, आदिनाथ माने, हनुमंत पांढरे, सागर बनकर, प्रेसिंजीत कांबळे, दीपक भोसले, लतीफ शेख, अशोक परदेशी, अक्षयकुमार शेलार, सचिन गरुडे, नंदकुमार कांबळे, स्वप्नील जाधव यांच्यासह अनेक समविचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त करत आर. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी अरुण माने यांची बामसेफचे राज्यकार्यकारणी सदस्य पदी तर प्रेमकुमार सरतापे यांची भारतीय विध्यार्थी मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी करमाळा मूलनिवासी न्यूज या युटूब चॅनलचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी नंदकुमार कांबळे व प्रेमकुमार सरतापे यांनी कविता सादर केल्या. 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश कांबळे यांनी केले तर आभार दिनेश माने यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर