करमाळा शहरात भुरट्या भावी नगरसेवकांच्या सुळसुळाट

निवडणुकीच्या तोंडावर भुरट्या भावी नगरसेवकांचा सुळसुळाट. 

"ना राजकारणाचं ज्ञान,ना प्रभागातील समस्यांची जाण, ना सामाजिक भान."

करमाळा नगरपालिका निवडणूकीचे पडघम जसजसे वाजु लागले आहेत तसतसे शहराच्या गल्ली बोळातुन नवनवीन "'भावी नगरसेवकांची'" पैदास होऊ लागली आहे.ज्यांच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही अश्या लोकांना सुद्धा नगर सेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. शहरातील व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप अशा सोशल मीडियावर झळकणारे स्टेटस फोटो व व्हिडिओ बनवून काही भुरटे कार्यकर्ते प्रसारित करीत असतात. त्यातून या भावींना आपण नगरसेवक असल्याचा "फील" देखील यायला सुरवात होते. काही भावी नगरसेवक तर असे आहेत स्वतः जन्म दिलेल्या लेकरांची लग्नसुद्धा "वर्गणी" करून लावले आहेत.अशा लोकांना सुद्धा नगरसेवकाचे स्वप्ने पडू लागली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं कशी बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडे चार वर्षाच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत आणि प्रभागातील एकाही प्रश्नावर हे आवाज उठवत नाहीत की साधं प्रशासनाला एक निवेदनही देत नाहीत.याचं मुख्य कारण म्हणजे यांना प्रभागातील समस्याच माहित नसतात आणि माहित असलं तरी बघु निवडणूक आल्यावर या वृत्तीमुळे गप्पं राहतात. अनेकदा प्रभागातील मतदारांनाही हा कोण नवीन उगवला असा प्रश्न पडणे इतपत. हा भावी नगरसेवक नवीन असतो पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फाफट कार्यक्रम घेऊन आपण किती कार्यक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच कोणी अनुभवी नागरिकाने मार्गदर्शन केले  तरी त्यांचा सल्ला फाट्यावर मारत आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवून द्यायचे. याचा शेवट हा आपल्याच पायावर धोंडा मारून  घेण्यासारखे आहे हे मात्र त्यांच्या ध्यानात ही येत नाही. 
अश्या संधी साधु आणि भुरट्या भावी नगरसेवकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.भावी असो की विद्यमान नगरसेवक 'पाच वर्षांत तुम्ही प्रभागासाठी काय केलं? हा जाब सामान्य मतदारांनी विचारले पाहिजे. पैसा आणि दारू, मटणाला न जुमानता, तळमळीने काम करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे तर आणि तरच प्रभागातील सच्चा आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि अश्या भुरट्या भावी नगरसेवकांच्या उत्पतीला आळा बसेल.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर