Posts

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

*बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन* करमाळा प्रतिनिधी  करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी लेझर खतना कॅम्प या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच या कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केली आहे. सदरची खतना सोलापूर येथील सुप्रसिद्ध खतना स्पेशलिस्ट डॉक्टर हाजी नासीर सय्यद हे करणार आहे. सदर लेझर खतना कॅम्पचे उद्घाटक एडवोकेट हाजी कलीम काझी तालुकाध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते ठेवण्यात आले असून सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काजी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफीभाई काजी, तसेच तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक जेलर समीर पटेल, तसेच हयात मेडिकल अहमदनगर येथील आदिल याकूब शेख, तसेच हाजी कलीम काजी सर दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख मंडल अधिकारी हाजी सादिक काजी बार्शी येथील निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई शेख भुमचे सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर पठाण सर तसेच डॉक्टर सादिक बागवान करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ...

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी.

Image
*राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी* करमाळा प्रतिनिधी  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्तविद्यमाने हजरत मुहम्मद पैगंबर साहेब जयंती अर्थात ईद ए मिलाद करमाळा येथील मदरसा ए फैजुल कुरआन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ व बक्षीस वाटप करण्यात आले.  यावेळी मदरशाचे कारी इस्माईल शेख, मौलाना सय्यदअली मुजावर, मौलाना सिकंदर मुलाणी, हाफिज कादिर शेख, आर. आर. पाटील, इसाक पठाण यांनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कय्युम शेख, मैनुद्दीन शेख, बशीर शेख, शहनवाज कुरेशी, सोयेब कुरेशी, अमीर मोमीन, तौसिफ मुलाणी, जैद शेख यांच्यासह बामसेफ राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, तालुका अध्यक्ष गंगाराम भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, दिनेश दळवी, भीमराव कांबळे, दिनेश माने, मधुकर मिसाळ, दीपक भोसले, रावसाहेब जाधव, विनोद हरिहर, बाबुराव पाटील, रामजी कांबळे, अद्वैत माने आदीजण उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड.

Image
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र प्रेरित झालेला आहे असे मत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांनी व्यक्त केले ते करमाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस भवन दत्तपेठ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुकाध्यक्षपदी आदित्य नितीन जगताप यांना नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली शेतकरी ,कामगार ,विद्यार्थी यांना नेहमीच त्यांनी पाठबळ दिलेले आहे राज्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आवाज उठवत आहे तसेच प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या  हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहे राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्या विचाराने करमाळ्यातील जगताप घराणे काम करत आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुक्यातील विद्यार्थी व युवकांसाठी सदैव कार्यर...

पुणे शहरात स्वातंत्र्य सेनानी हजरत टीपू सुलतान यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ करमाळा येथे निवेदन

Image
पुणे शहरातील दत्तनगर भागात स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक शब्द वापरून त्यांची विटंबना करून समस्त मुस्लिम समाज आणि अनेक भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करणे बाबत. आज करमाळा येथे सकल मुस्लिम समाज करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने करमाळा तहसीलदार आणि करमाळा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना करमाळा शहरातील श.ह.टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष - सुफरान शेख,श.ह.टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव - अफजल शेख,युवा सेनेचे जिल्हा सचिव - सोहेल पठाण, अल सहारा ग्रुपचे अध्यक्ष - तोफिक शेख,मुस्तकीम पठाण, पै. अमीन बेग, युसुफ शेख, अमर शेख, शाहरुख नालबंद, अजीम पठाण, भैय्या पठाण,  राजू पठाण,  साजिद (बिल्डर) तांबोळी, नाजीम खान, अबू बागवान, शाहरुख शेख, मोहिदिन बागवान व मुस्लिम समाजातील बहू संख्य नागरिक उपस्थित होते.

करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी.

Image
करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी. करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम अलैहीसलाम आणी हजरत ईस्माईल अलैहीसलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानी महत्व पटवून दिले.प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणार्‍या ईद-उल- अजहा सणानिमित्त समाजात एकता आणि सौहार्द वृद्धिंगत व्हावे ही शुभकामना असे सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी

Image
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी : कार्यकारिणी जाहिर ** करमाळा: प्रतिनिधी  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड. नईम काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन या संघटनेची  करमाळा तालुक्यातील  कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन च्या करमाळा शाखेत आयोजित कार्यक्रमात  करमाळा तालुका शहरातील पदाधिका-यांना ॲड. नईम काझी  यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी  तालुका उपाध्यक्षपदी राजू बागवान ,  मेहमूद शेख , तालुका सचिवपदी जिलानी शेख,शहराध्यक्षपदी फिरोज शेख, उपाध्यक्षपदी शाहरुख शेख , सचिवपदी गुलाम सय्यद यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. शिवराज जगताप,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरउपाध्यक्ष आझाद शेख,  सामाजिक कार्यकर्ते ॲड. योगेश  शिंपी , रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सूरज शेख, उपाध्यक्ष  ईमत्याज पठाण, झिशान कबीर , एअरफोर्सचे नॅशनल हाॅलीबॉल पटू जाहीद काझी, बिलाल शेख, राजू सय्यद, अ...

महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : Adv. माया जमदाडे

Image
*महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : एड. माया जमदाडे* करमाळा दि. २७ प्रतिनिधी  भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये  विविध विषयावर प्रबोधन करून जागृती निर्माण करण्यासाठी परिवर्तन यात्रा सुरु असून सदर परिवर्तन यात्रा करमाळा येथे आली असता यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष एड. माया जमदाडे बोलत होत्या. यावेळी सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रज्ञाताई कांबळे या उपस्थित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राज्यध्यक्षा संगीता शंदे आणि उपध्याक्षा ज्योती मिसाळ उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मांजरगाव ग्रामपंचायत सदस्या काजल खरात, अर्बन बँक संचालिका वंदना कांबळे आणि आशाताई क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना एड माया जमदाडे म्हणाल्या कि, आज भारतामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या हक्क अधिकारावर बंधने आणली जात आहेत. महिलांच्या ...