करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी.
करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी.
करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम अलैहीसलाम आणी हजरत ईस्माईल अलैहीसलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानी महत्व पटवून दिले.प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणार्या ईद-उल- अजहा सणानिमित्त समाजात एकता आणि सौहार्द वृद्धिंगत व्हावे ही शुभकामना असे सांगितले.
Comments
Post a Comment