Posts

राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) करमाळा तालुका यांच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन.

Image
करमाळा (28/4)प्रतिनिधी राजु सय्यद  अखिल भारतीय काँग्रेस (आय ) पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आज करमाळा येथिल  मुस्लिम बांधवांना  सुलेमांनिया आनंदबाग कब्रस्थान मज्जिद येथे पवित्र रमजाण महीन्या निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी मा.कलिम काझी सर उपस्थित होते.वास्तविक पहाता जगताप कुटुंब व मुस्लिम समाजाचे  स्व.नामदेवरावजी जगतापसाहेबा पासुनचे ऋणाणुबंधाचे नाते आहे.आणि आज हीच परंपरा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणीदादा जगताप, करमाळा नगर पालिकेचे माजी नगरसेवक राहुल भैय्या जगताप व प्रतापराव जगताप यांनी कायम ठेवले आहेत.मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक सणासाठी जगताप कुटुंबाचा हिरीरीने सहभाग असतो.राजकारण बाजुला ठेवुन मुस्लीम समाजाच्या प्रत्येक अडी अडचणीत प्रतापराव जगताप हे ठामपणे ऊभा राहीले आहेत.यापुढील काळात देखिल मुस्लीम समाजासाठी भरीव कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.या कार्यक्रमासाठी दस्तगीर पठाण,जैन्नुद्दीन शेख,अक्तर सय्यद,सुजय जगताप,अमोल पवार,योगेश राखुंडे,बबलु चिंचकर,नितीन चोपडे आदी उपस्थित होते.कार्य...

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

Image
जिल्ह्यातील ५९ गावांमधून जाणार; जाणून घ्या गावांची नावे बार्शी, दक्षिण तसेच अक्कलकोटमधील ५१ गावांचा समावेश, उत्तरमधील फक्त ८ गावे सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर सोलापूर जिल्ह्यातील ५९ गावांमधून जाणार; जाणून घ्या गावांची नावे सोलापूर : जिल्ह्यासाठी बहुउपयोगी ठरणाऱ्या सूरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्स्प्रेस ज्या गावातून जाणार आहे, त्या ५९ गावांची नावे गुरुवारी द गॅझेट ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहेत. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, भूसंपादन प्रक्रिया लवकरच ५९ गावांतून सुरू होईल, अशी माहिती देखील गॅझेटद्वारे देण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील १८, उत्तर सोलापूर तालुक्यातील ८, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १६, तसेच अक्कलकोट तालुक्यातील १७ गावांमधून कॉरिडॉर जाणार आहे. ५९ गावांमधून १५३ कि.मी.चे भूसंपादन होणार असून, हा महामार्ग सहा पदरी असणार आहे. सूरत चेन्नई कॉरिडॉरबाबत खूप उत्सुकता लागून राहिली होती. कोणत्या गावातून कॉरिडॉर जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर ही उत्सुकता संपली असू...

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध.

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासादर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे करमाळा  शहराध्यक्ष ॲडव्होकेट  शिवराज जगताप व शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले. माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा आज वरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या राजकारणाला काळीमा फासणारी दुर्देवी घटना आहे. आजवरच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता. तसेच महाविकास आघाडी सरकारने S T संपकरी यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना समाधान कारक वेतन व सुविधा देण्याचे मान्य केले होते व काही कामगार संघटनानी कामावर येण्याचे मान्यपण केले होते.परंतु काही लोकांनी कोर्टामार्फत राज्यातील जनतेला गेली सहा महिने वेठीस धरले आहे. या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक,विद्यार्थी  व रुग्ण यांची खूपच हेळसांड झाली आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांवर कारवा...
*निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता ?* -निवडणूकीचा अचानक केंव्हाही फुटू शकतो बॅाम्ब. दि. २५ मार्च २०२२ सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्या दृष्ट्रीने सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा मे महिन्यात निवडणूका होणार असल्याच्या वृत्तास दूजोरा देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था या लोकशाहीतील महत्वपुर्ण संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांच्या निवडणूका संपन्न होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको म्हणून सत्ताधा-यांसह विरोधकांनी निवडणूका सहा महिने पुढे ढकलण्याचा कायदा विधिमंडळात पारीत केला. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करणे, आरक्षण व मतदानाची तारीख ठरविण्याचे अधिकार महाराष्ट्र शासन...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मे महिन्यातच होणार ,एप्रिल मध्ये लागु शकते आचारसंहितेची.

Image
*निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता ?* -निवडणूकीचा अचानक केंव्हाही फुटू शकतो बॅाम्ब. दि. २५ मार्च २०२२ सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्या दृष्ट्रीने सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा मे महिन्यात निवडणूका होणार असल्याच्या वृत्तास दूजोरा देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था या लोकशाहीतील महत्वपुर्ण संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांच्या निवडणूका संपन्न होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको म्हणून सत्ताधा-यांसह विरोधकांनी निवडणूका सहा महिने पुढे ढकलण्याचा कायदा विधिमंडळात पारीत केला. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करणे, आरक्षण व मतदानाची तारीख ठरविण्याचे अधिकार महा...

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर

Image
करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. करमाळा नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर अनुसूचित जाती महिलांसाठी २ व सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गुरुवारी (ता. १०) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला असून यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत. अशी आहे प्रारूप प्रभाग रचना : *प्रभाग क्रमांक 1* : लोकसंख्या २५१७, अनुसूचित जाती ३८७, अनुसूचित जमाती ३७. प्रभागाची व्यप्ती : कानडे वस्ती, सुमंतनगर, कुंभारवाडा, किल्ला वेस, मोहल्ला. प्रभागाची सीमा : उत्तर : कानडे वस्ती ते पूर्वेकडील नालबंद वस्ती, ओढा ते नगरपालिका हद्द. पूर्व : नालबंद वस्ती ओढा, नगरपालिका हद्द ते मार्केट यार्ड कंपाऊंड पश्चिम बाजू, राहुल सावंत घर ते वांगडे बोळीतून मोकने सर घर ते सुशील वनारसे घर. दक्षिण : सुशील वनारसे ते नंदू चिवटे दुकान ते नारायण जाधव घर ते किल्ला तटबंदी उत्तर बाजूने संभाजी नगर भिसे घर ते सुमंतनगर, सांगळे सर घर पर्यंत. प...

युवराज जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान

Image
युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाढदिवस म्हणलं की  आपण नेहमी डिजे, पार्ट्या ,नाच ,गाणे करतो पण युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त              श्रीराम प्रतिष्ठानने घेतलेल्या अन्नदानाचा वसा पुढे नेण्यासाठी       श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या अन्नसंस्कार पूजेत सहभागी होऊन. आज मातंग समाज नेते स्वर्गीय  नामदेव  जगताप युवा मंच  यांच्या वतीने मातंग समाजाचे युवा नेते युवराज भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त  अन्नसंस्कार पूजेमध्ये सहभाग घेऊन गोरगरीब वृद्धांना अन्नदान करण्यात आले. युवराज जगताप युवा मंच हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप,रूग्णालयात फळे, चादर वाटप, फिरस्ती लोकांना  शाल, अन्न वाटप करतात.  महा पुरूषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करतात.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त युवराज जगताप हे मातंग एकता आंदोलनचे युवा अध्यक्ष व मातंग समाज नेते स...