शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासादर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे करमाळा शहराध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज जगताप व शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले. माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा आज वरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या राजकारणाला काळीमा फासणारी दुर्देवी घटना आहे. आजवरच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता. तसेच महाविकास आघाडी सरकारने S T संपकरी यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना समाधान कारक वेतन व सुविधा देण्याचे मान्य केले होते व काही कामगार संघटनानी कामावर येण्याचे मान्यपण केले होते.परंतु काही लोकांनी कोर्टामार्फत राज्यातील जनतेला गेली सहा महिने वेठीस धरले आहे. या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक,विद्यार्थी व रुग्ण यांची खूपच हेळसांड झाली आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांवर कारवाई होणे गरजेचे आहे.तसेच खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी झाली पाहिजे व यामध्ये जे दोषी आरोपी सिद्ध होतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली
Comments
Post a Comment