राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) करमाळा तालुका यांच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन.

करमाळा (28/4)प्रतिनिधी राजु सय्यद 
अखिल भारतीय काँग्रेस (आय ) पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आज करमाळा येथिल  मुस्लिम बांधवांना  सुलेमांनिया आनंदबाग कब्रस्थान मज्जिद येथे पवित्र रमजाण महीन्या निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी मा.कलिम काझी सर उपस्थित होते.वास्तविक पहाता जगताप कुटुंब व मुस्लिम समाजाचे  स्व.नामदेवरावजी जगतापसाहेबा पासुनचे ऋणाणुबंधाचे नाते आहे.आणि आज हीच परंपरा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणीदादा जगताप, करमाळा नगर पालिकेचे माजी नगरसेवक राहुल भैय्या जगताप व प्रतापराव जगताप यांनी कायम ठेवले आहेत.मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक सणासाठी जगताप कुटुंबाचा हिरीरीने सहभाग असतो.राजकारण बाजुला ठेवुन मुस्लीम समाजाच्या प्रत्येक अडी अडचणीत प्रतापराव जगताप हे ठामपणे ऊभा राहीले आहेत.यापुढील काळात देखिल मुस्लीम समाजासाठी भरीव कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.या कार्यक्रमासाठी दस्तगीर पठाण,जैन्नुद्दीन शेख,अक्तर सय्यद,सुजय जगताप,अमोल पवार,योगेश राखुंडे,बबलु चिंचकर,नितीन चोपडे आदी उपस्थित होते.कार्यक्रम पार पाडण्यासाठी संदेश माळवे,निखील कदम यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर