Posts

Showing posts from June, 2022

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन- श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.

Image
*सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन-  श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.*          *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.*        *BJP चे श्री.शंभुराजे जगताप यांच्या* *मार्गदर्शनाखाली स्वतः शंभूराजे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या योग दिनाचे आयोजन केले. महात्मा गांधी विद्यालय,करमाळा येथे* *सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधा...

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा - करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये*

Image
*नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा - करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये* माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी श्री कमलाभवानी दर्शनासाठी आले होते.दर्शनानंतर जगदंबा ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली. या वेळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल चर्चा केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी,तालुका उपाध्यक्ष रामा ढाने,मोहन शिंदे,महाराष्ट्र चमपियन अफसर जाधव,व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर,काका सरडे,बाळासाहेब...

दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेच्या आदेशाला दिलेला स्थगिती आदेश सहकार व पणनमंत्री यांचेकडूनअखेर रद्द,

Image
*दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेच्या आदेशाला दिलेला स्थगिती आदेश सहकार व पणनमंत्री यांचेकडूनअखेर रद्द, बागल अपात्रच , बागल गटाला धक्का, जगताप गटात आनंदोत्सव*   दिग्विजय बागल यांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी केलेल्या अर्जानुसार पणन संचालक पुणे यांनी रद्द करत बागल यांना अपात्र ठरविले होते . यावर बागल यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते .उच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत कायद्यातील तरतुदीनुसार राज्य सरकारकडे अपील करणेबाबत आदेश दिले होते . त्यावेळी बागल यांनी राज्य शासनाकडे अपील दाखल केलेनंतर तब्बल १ वर्षानंतर त्यांना स्थगिती मिळाली होती त्यानंतर कोरोना काळामुळे त्यांना सदस्यपदी राहता आले होते . परंतु अखेर नैसर्गिक न्याय तत्वानुसार वादी व प्रतिवादी यांनी आपले म्हणणे मांडून गुणवत्तेवर निर्णय देणेसाठी स्थगिती आदेश उठविणे आवश्यक असलेची शासनाची खात्री झालेने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  दिलेला स्थगिती आदेश रद्द करत असलेबाबतचे आदेश पारीत केले . या आदेशामुळे बागल गट...

कामगार विरोधी धोरणाच्या संदर्भात राज्यभर निशेध आंदोलन करणार* ---मा.प्रदिपभाऊ कांबळेता.करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

Image
*कामगार विरोधी धोरणाच्या संदर्भात राज्यभर निशेध आंदोलन करणार* ---मा.प्रदिपभाऊ कांबळे ता.करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीची राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.प्रदिपभाऊ कांबळे बोलत असताना , म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशान्वये राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे अनेक कारखाने बंद केल्यामुळे बहुजन समाजातील अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे,तसेच बांधकाम कामगारांच्या  वेगवेगळ्या योजना कागदोपत्री दाखवून राज्य सरकार  बांधकाम कामगारांना सहाभूती दाखवण्याचा किळसवाणी प्रकार  करत आहे, पुढे बोलताना भाऊ म्हणाले देशाचा ,राज्याचा कणा असणारा असंघटित कामगार, शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर बैठका घेऊन सरकारला धडा शिकविण्यासाठी 11 जुलैला  राज्य भर सरकारकाच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी सौ.विद्याताई गायकवाड यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्य...

राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी

Image
*राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी* करमाळा दि. ९ प्रतिनिधी  अनुसुचीत जाती / जमातीच्या ग्रामपंचायत मधील राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेश रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने आरक्षण सोडत करण्यात यावी या मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाला करमाळा युनिटच्या वतीने देण्यात आले.  यावेळी सदरचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी स्वीकारले. सदर निवेदनामध्ये म्हटले आहे कि,  राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेशप्रमाणे महाराष्ट्रात सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत चाक्रनुक्रमे पद्धतीने काढण्यात आली आहे. त्यामध्ये असे दिसून येते कि, अनुसुचीत जाती / जमातीचे मतदार ज्या प्रभागात नगण्य आहेत अथवा शून्य आहेत अशा प्रभागांमध्ये अनुसुचीत जाती / जमातीचे आरक्षण पडलेले आहे. हा अनुसुचीत जाती / जमातीच्या उमेदवार व मतदार यांचेवर अन्याय आहे. कारण राखीव मतदारसंघाच्या तत्वाप्रमाणे अनुसुचीत जाती / जमातीची संख्...