राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी

*राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी*

करमाळा दि. ९ प्रतिनिधी 

अनुसुचीत जाती / जमातीच्या ग्रामपंचायत मधील राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेश रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने आरक्षण सोडत करण्यात यावी या मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाला करमाळा युनिटच्या वतीने देण्यात आले. 

यावेळी सदरचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी स्वीकारले.

सदर निवेदनामध्ये म्हटले आहे कि,  राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेशप्रमाणे महाराष्ट्रात सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत चाक्रनुक्रमे पद्धतीने काढण्यात आली आहे. त्यामध्ये असे दिसून येते कि, अनुसुचीत जाती / जमातीचे मतदार ज्या प्रभागात नगण्य आहेत अथवा शून्य आहेत अशा प्रभागांमध्ये अनुसुचीत जाती / जमातीचे आरक्षण पडलेले आहे. हा अनुसुचीत जाती / जमातीच्या उमेदवार व मतदार यांचेवर अन्याय आहे. कारण राखीव मतदारसंघाच्या तत्वाप्रमाणे अनुसुचीत जाती / जमातीची संख्या ज्या मतदारसंघात जास्त असते तिथेच असे आरक्षण पडत असते. त्यामुळे लोक आपला सच्चा व समाजाप्रती इमानदार प्रतिनिधी आपल्या मताद्वारे निवडून देऊ शकतात. ज्या प्रभागात अनुसुचीत जाती / जमातीचे मतदारच नसतील किंवा नगण्य असतील तिथे आरक्षण पडल्यामुळे एकतर पक्ष किंवा पक्षप्रमुख ज्या अनुसुचीत जाती / जमातीच्या उमेदवाराचे समर्थन करतील तोच उमेदवार निवडून येईल. त्यामुळे तो समाजाचा सच्चा व इमानदार न राहता पक्षाचा गुलाम म्हणून काम करेल. त्यामुळे सदर आदेश तत्काळ रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने म्हणजेच ज्या प्रभागत अनुसुचीत जाती / जमातीचे मतदार बहुसंखेने राहत असतील तिथेच अनुसुचीत जाती / जमातीचे आरक्षण पडावे. राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेश १० दिवसात रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने नव्याने आरक्षण सोडत न काढल्यास राज्यव्यापी आंदोलनाच इशारा सदर निवेदनात दिला आहे.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी तालुका अध्यक्ष दिनेश माने, माढा लोकसभा प्रभारी आर. आर. पाटील, करमाळा माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, अरुण माने, गौतम खरात, कय्युम शेख, गोविंदा खरात, प्रेमकुमार सरतापे, भीमराव कांबळे, दिनेश दळवी आदीजण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर