सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन- श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.
*सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन- श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.*
*भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.*
*BJP चे श्री.शंभुराजे जगताप यांच्या* *मार्गदर्शनाखाली स्वतः शंभूराजे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या योग दिनाचे आयोजन केले. महात्मा गांधी विद्यालय,करमाळा येथे* *सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचा योग दिन व योगासनांचे मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्व यावर बोलताना- मोठ्या डिजिटल स्क्रीनवर- व्हिडिओ स्पीच ने करण्यात आली. हा योग दिन साजरा करताना कोणत्याहीप्रकारचा राजकीय सहभाग न घेता, सामाजातील जास्तीत- जास्त लोक सहभाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.*विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व या ठिकाणी योग शिक्षकांद्वारे पटवून देण्यात आले. करमाळा शहरातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. करमाळा शहरातील सरकारी पदाधिकारी, सेवा संस्थेचे सदस्य, व्यापारी वर्ग, हा योग दिन साजरा करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.यावेळी शंभूराजे जगताप यांनी स्वतः काही अवघड योगासने उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली.योग शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग नियमांचे पालन करून योग आसने शिकविली.सर्व विद्यार्थ्यांनी योग आसने करत आनंद व्यक्त केला.शंभूराजेंनी आयोजित केलेल्या या भव्य -दिव्य अशा योग दिनासाठी शंभूराजेंवर करमाळा तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.*
*योगाभ्यासाचे महत्त्व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. योगासनांमुळे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास तर होतोच त्याचबरोबर याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते.बीपी पेशंटसाठी योगा त्याच्या टॅब्लेटइतकेच जीवनासाठी महत्वाचे आहे. काही आजारात पडल्यानंतर आणि नंतर त्याच्या उपचारासाठी इकडे -तिकडे धावणे आणि बराच खर्च केल्यावर आजपासून योगासाठी वेळ काढणे चांगले. यात कोणतीही किंमत नाही आणि तोटा नाही. योगाचे फक्त फायदे आहेत, जे जगातील सर्व लोकांनी ओळखले आहेत, म्हणूनच देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.*
Comments
Post a Comment