दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेच्या आदेशाला दिलेला स्थगिती आदेश सहकार व पणनमंत्री यांचेकडूनअखेर रद्द,
*दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेच्या आदेशाला दिलेला स्थगिती आदेश सहकार व पणनमंत्री यांचेकडूनअखेर रद्द, बागल अपात्रच , बागल गटाला धक्का, जगताप गटात आनंदोत्सव*
दिग्विजय बागल यांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी केलेल्या अर्जानुसार पणन संचालक पुणे यांनी रद्द करत बागल यांना अपात्र ठरविले होते . यावर बागल यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते .उच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत कायद्यातील तरतुदीनुसार राज्य सरकारकडे अपील करणेबाबत आदेश दिले होते . त्यावेळी बागल यांनी राज्य शासनाकडे अपील दाखल केलेनंतर तब्बल १ वर्षानंतर त्यांना स्थगिती मिळाली होती त्यानंतर कोरोना काळामुळे त्यांना सदस्यपदी राहता आले होते . परंतु अखेर नैसर्गिक न्याय तत्वानुसार वादी व प्रतिवादी यांनी आपले म्हणणे मांडून गुणवत्तेवर निर्णय देणेसाठी स्थगिती आदेश उठविणे आवश्यक असलेची शासनाची खात्री झालेने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द करत असलेबाबतचे आदेश पारीत केले . या आदेशामुळे बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे . यामुळे जगताप गटाची बाजार समिती वरील पकड अधिक मजबूत झाली आहे . बाजार समितीच्या ऑक्टोंबर २०१८ मधे घडलेल्या घडामोडी नंतर पासूनच्या प्रत्येक घटनेमधे जगताप गटाला यश येत आहे हे तळेकर स्विकृत सदस्य रद्द होणे, पोटनिवडणुकीतील विजय, बागल - चिंतामणी जगताप सदस्य अपात्रता निर्णय, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निर्णय, सचिव नेमणूक, शेतकरी -व्यापारी -कर्मचारी आदींचे जगताप गटाला असणारे समर्थन या सर्व बाबी मधून जगताप गटाची सक्षम कायदेशीर यंत्रणा व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बाजार समिती वरील असलेली मजबूत पकड अधिक मजबूत होत असल्याचे द्योतक आहे . "सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नही" अशी प्रतिक्रिया या निर्णयावर जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी दिली आहे .
Comments
Post a Comment