कामगार विरोधी धोरणाच्या संदर्भात राज्यभर निशेध आंदोलन करणार* ---मा.प्रदिपभाऊ कांबळेता.करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

*कामगार विरोधी धोरणाच्या संदर्भात राज्यभर निशेध आंदोलन करणार* ---मा.प्रदिपभाऊ कांबळे
ता.करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

कामगार आघाडीची राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.प्रदिपभाऊ कांबळे बोलत असताना , म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशान्वये राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे अनेक कारखाने बंद केल्यामुळे बहुजन समाजातील अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे,तसेच बांधकाम कामगारांच्या  वेगवेगळ्या योजना कागदोपत्री दाखवून राज्य सरकार  बांधकाम कामगारांना सहाभूती दाखवण्याचा किळसवाणी प्रकार  करत आहे, पुढे बोलताना भाऊ म्हणाले देशाचा ,राज्याचा कणा असणारा असंघटित कामगार, शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर बैठका घेऊन सरकारला धडा शिकविण्यासाठी 11 जुलैला  राज्य भर सरकारकाच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे सांगितले.त्यावेळी सौ.विद्याताई गायकवाड यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य सरचिटणीस मा.गुणवंत नागटिळ हे होते तर कार्यक्रमाचे निमंत्रक पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड हे होते, त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित सुनिल साळवे,प्रदिप गंगावणे,दादा शेलार, गणेश कांबळे,रामभाऊ कर्वे, संतोष गायकवाड,परवेश  शेख,ता अध्यक्ष अर्जुन गाडे, बाळासाहेब टकले, किशोर पाटोळे,यांची भाषणे झाली त्यावेळी दिपक ईसावे, किशोर कांबळे, अशोक कांबळे, कृष्णा लोखंडे,बाळू कांबळे, पांडूरंग चव्हाण, महादेव गायकवाड उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन करमाळा तालुका अध्यक्ष अरूण नागटीळक 
,मनोज घाडगे, अमोल शेलार, युवराज जगदाळे, दादा शेलार, हे होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
 नाना नागटिळक,पै.महादेव शेलार, भैय्या गायकवाड, गणेश शेलार, शंकर गायकवाड, अतुल नागटिळक, बळीराम गायकवाड, अतुल नागटिळक मुन्ना शेलार, भैय्या जगदाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर