नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा - करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये*

*नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा - करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये*

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी श्री कमलाभवानी दर्शनासाठी आले होते.दर्शनानंतर जगदंबा ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली.

या वेळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल चर्चा केली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी,तालुका उपाध्यक्ष रामा ढाने,मोहन शिंदे,महाराष्ट्र चमपियन अफसर जाधव,व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर,काका सरडे,बाळासाहेब कुंभार,प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,संजय जमदाडे,विशाल परदेशी,जितेश कांबळे सर,विनोद महानवर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर