Posts

Showing posts from December, 2022

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार

Image
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक आहेत :- शरद भैय्या पवार                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे लोकशाही संविधान होय असे मत मातंग एकता आंदोलनाचे करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी व्यक्त केले, रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे जगाला तारू शकते नको राजे शाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही असे त्यांनी यावेळी उद्गार काढले तसेच बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी असेही त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आधारित ग्र...

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

Image
*करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन* करमाळा - करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,  पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वर मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत , पुढे जाऊन याचे रूपांतर  कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे, याचाच विचार करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात - भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5  वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहोत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो, या विवाह सोहळ्याचे आयोजन क...

आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले.

Image
आम आदमी पार्टी करमाळा    यांच्याकडून  आज दिनांक -05/12/2022 रोजी राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर नऊ मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना माननीय तहसीलदार श्री समीर माने साहेब यांच्यामार्फत देण्यात आले.              याप्रसंगी श्री आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शिंदे , मा. उपसरपंच , पोथरे , श्री विजय थोरात , उपसरपंच , वडगाव , श्री शंकर कुलकर्णी ,करमाळा आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा संघटक श्री अमोल जाधव, करमाळा , श्री दत्तात्रय काटकर , करमाळा , श्री बबन खटके पोथरे , इत्यादी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.