*करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-अजहा (बकरी ईद)उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी.*
करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली.
तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .
करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम (अ.) आणी हजरत ईस्माईल(अ.)ने इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानीचे महत्त्व सांगीतले.
तसेच देशभर मुस्लीम आणि हिंदू बांधवांवर घडलेल्या सर्व अन्यायकारक घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
Comments
Post a Comment