भाजपाचे युवानेते शंभूराजे जगताप यांचा किंग्ज फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या योग दिन सोहळ्या नंतर शहरवासियांसाठी पून्हा एकदा ' सामुहिक दिंडी सोहळ्याचा 'योग*

करमाळा शहरात टाळ , मृदंगाच्या निनादात व विठ्ठल नामाच्या गजरात , भगव्या पताका व पारंपारीक पेहरावात अवतरली पंढरी.........
[ भाजपाचे युवानेते शंभूराजे जगताप यांचा किंग्ज फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या योग दिन सोहळ्या नंतर शहरवासियांसाठी पून्हा एकदा ' सामुहिक दिंडी सोहळ्याचा 'योग ]

आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर च करमाळा शहरातील शाळकरी मुला - मुलीं साठी , पालक , युवकवर्ग व नागरिकां साठी आज ' सामुहिक दिंडी सोहळ्यातून ' चक्क पंढरी राया विठ्ठला च्या दर्शनाची अनुभूतीच आली . भाजपाचे युवानेते शंभूराजे यांच्या संकल्पनेतून व पूढाकारातून व किंग्ज फाऊंडेशन च्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव , दहिहंडी तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे  विवीध सण - उत्सव व सामाजिक उपक्रमांची शहर व तालुका वासियांसाठी नेहमीच खास पर्वणी असते . 
कोरोना काळातील त्यांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. आज शनिवारी  सकाळ पासुनच शहरात  भक्तीमय वातावरण झाले होते . हातात भगव्या पताका, टाळ - मृदंग, तबला, हार्मोनियम , विणा , महाराष्ट्रा सह संपूर्ण भारताच्या संस्कृती चे दर्शन घडवणारी वेशभूषा यामध्ये विशेषतः श्रीराम , लक्ष्मण , विठ्ठल , श्रीकृष्ण , या शिवाय  आई जिजाऊ , शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद , सावित्रीबाई फुले , झाशीची राणी , आहिल्यादेवी , तसेच संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , संत बाळुमामा अशा  विवीध रूपात शहरातील नगर पालिकेच्या सर्व शाळां , महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज सह लीड स्कुल चे  शाळकरी मुले - मुले , मुख्याध्यापक - मुख्याध्यापिका , शिक्षक - शिक्षीका , माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी व पालक दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते . याशिवाय शेतकऱ्यांच्या वेषातील वारकरी , खेळाडुंच्या वेशातील , तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या वेशातील  वारकरी , पर्यावरण जागृती , कृषी , वैज्ञानिक , आरोग्य विषयक , शैक्षणिक , व विवीध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेवून विवीध संदेश  देत या चिमूकल्या वारकर्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले .
 महाराष्ट्राचा सामाजिक अन् सांस्कृतिक वारसा या दिंडी मूळे जोपासण्याचे काम या निमीत्ताने झाले आहे .महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रागंणातून सर्व प्रथम  आयोजक युवानेते शंभूराजे जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले .ह भ .प . साबळे महाराज यांनी दिंडी व अध्यात्माच्या महत्वाचे विवेचन केले त्यानंतर ह . भ . प . साबळे महाराज , युवानेते शंभूराजे जगताप,म गांधी विद्यालयाचे प्राचार्य कापले पोपटराव , सर्व न.प.प्रशालांचे मुख्याध्यापक - मुख्याध्यापिका व इतर मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व अश्व पूजन करून या 'सामूहिक दिंडी ' सोहळ्याची सुरुवात झाली व किल्ला वेस - वेताळ पेठ - जय महाराष्ट्र चौक - शिवाजी महाराज पुतळा - सुभाष चौक -डॉ आंबेडकर पुतळा ते देशभक्त नामदेवराव जगताप क्रिडा संकुल ( जिन मैदान ) येथे नेत्रदिपक रिंगण सोहळा संपन्न झाला . दिंडी प्रवास करताना चिमुकल्या वारकऱ्यांचे शहरवासियांनी उत्साहाने स्वागत केले . दिंडी प्रवासात व रींगण सोहळ्यात  फुगडी , लेझीम , अभंग गौळण गायन , ढोल - ताशा व इतर पारंपारीक वाद्ये वादन, घोडेस्वारी याचा सर्वांनी पावसात भिजत आनंद घेतला . या उपक्रमाच्या आयोजनामुळे शहरासह तालुक्यात युवानेते शंभूराजे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे .

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja