मुदत संपलेल्या व नवनिर्मित एकूण २०७ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नवनिर्मित एकूण २०७ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्यानुसार मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील मा . सर्वोच्च न्यायालयाचे दि .०४ / ०५ / २०२२ रोजीचे आदेश . महोदय / महोदया , ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भाधीन क्र . २ येथील पत्रान्वये राज्यातील माहे मे २०२० ते माहे फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या " अ " वर्गातील एकूण १६ , माहे मे २०२० ते माहे मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या अशा एकूण " ब " वर्गातील ६७ आणि माहे एप्रिल- २०२० ते माहे फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या " क " वर्गातील १२० तसेच नवनिर्मित ४ नगरपरिषदांसह एकूण २०७ ( अ + ब + क- २०७ नगरपरिषदा ) सोबतच्या परिशिष्ट -४ मध्ये नमूद नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग रचना कार्यक्रम दिला होता . त्यानुसार मा . सर्वोच्च न्यायालयाने दि .०४ / ०५ / २०२२ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्रमांक अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबाबत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत : आदेश अ ) राज्य निवडणूक आयोगाने वरील परिच्छेद -१ मधील नमूद सर्व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि .२२ / ०२ / २०२२ रोजी प्रभाग रचना निर्गमित केला होता . सदर कार्यक्रमानुसार आक्षेप व हरकतीचा कालावधी दि . १०/०३/२०२२ ते दि . १७/०३/२०२२ असा होता . मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील दि . ०४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या दि . १०/०३/२०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत . यास अनुसरुन प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीच्या टप्प्यापासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सुधारीत कार्यक्रम देण्यात येत आहे . तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट -१,२ व ३ नुसार आक्षेप व हरकतीच्या टप्प्यापासूनच्या सुधारित कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात यावी . ब ) प्रभाग रचना अंतिम करण्याबाबतचे यापूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करुन राज्य निवडणूक आयुक्त यांनी त्यांचे अधिकार रानिआ आदेश क्र . रानिआ / नप २०२० / प्र.क्र .१ - अ / का .६ , दिनांक ०६/०२/२०२० अन्वये संबंधित मुख्याधिकारी , जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्रदान केले आहेत . क ) नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि . १० मार्च , २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दि .१० / ०३ / २०२२ पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी . तसेच सदर वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्पा वेळेवर व योग्य रितीने पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील . त्यानुसार त्यांनी योग्य ती सर्व उपाययोजना करावी . ५ . नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येईल . ६. राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार परिशिष्ट -४ मधील नमूद नगरपरिषदांबाबत प्रभाग रचना करण्यास बाधा येणारी कोणतीही बाब जसे न्यायालयीन प्रकरण इ . बाबतची माहिती आयोगास तात्काळ अवगत करावी .
त्यानुसार करमाळा नगर परिषदचा क वर्ग नगरपरिषदेत सामावेश होत असल्याने प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ परिशिष्ट -३ ( " क " वर्ग नगरपरिषदांसाठी ) मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील दि .०४ / ०५ / २०२२ च्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाच्या दि .१० / ०३ / २०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत . यास अनुसरून प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सुधारीत कार्यक्रम देण्यात येत आहे . त्यानुसार
अ ) प्रारूप प्रभाग रचना १. हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी १०/०५/२०२२ ( मंगळवार ) ते १४/०५/२०२२ ( शनिवार ) पर्यंत २. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे . जिल्हाधिकारी २३/०५/२०२२ ( सोमवार ) पर्यंत ३ . हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित जिल्हाधिकारी ३०/०५/२०२२ | विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांचेकडे अहवाल पाठविणे ( सोमवार ) पर्यंत ४ . अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे . संबंधित विभागीय ०६/०६/२०२२ आयुक्त ( सोमवार ) पर्यंत ब ) अंतिम प्रभाग रचना ( प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ) अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी ०७/०६/२०२२ | वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी ( मंगळवार ) पर्यंत | कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे . टीपा- प्रत्येक नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी उप जिल्हाधिकारीपेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी . असे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
Comments
Post a Comment