करमाळा येथे भारतीय जनता युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*
करमाळा - भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ,
त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय करमाळा येथे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली, यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश प्रभारी गणेश कुटे यांनी मार्गदर्शन केले व युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन दिले , पुढे
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड यांनी गणेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली युवा वारियरच्या शाखा काढणार असल्याचे सांगितले ,तसेच राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या दौऱ्याला
करमाळ्यातील युवा मोर्चा ची टीम सज्ज आहे असे सांगितले ,
करमाळ्यातील युवा मोर्चा ची टीम सज्ज आहे असे सांगितले ,
यावेळी प्रदेश सहप्रभारी पंडित भुजवण, प्रदेश सचिव दीपक चव्हाण,युवा नेते शंभुराजे जगताप, सुजित थिटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, प्रदीप पाटील, विकास वाघमारे, रंजीत जाधव ,सत्यजित सुरवसे ,करमाळा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक साळुंखे, राहुल रोंगे, मनोज मुसळे ,कोषाध्यक्ष चैतन्य पाठक ,मंगेश सावंत, निलेश चौधरी ,शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, उपाध्यक्ष कमलेश दळवी,तेजेश बोकन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
Comments
Post a Comment