रमजान ईद निमित्त निराधार , गरजु व वयोवृद्धांना अल्पोपहार.
*रमजान ईद निमित्त निराधार व गरजु लोकांना अल्पोपहार*
करमाळा ÷ (दि.3/05/22)
आज करमाळा शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपुर्णा योजने गरजु व निराधार व वयोवृद्धांना रमजान ईद निमित्त (शिरखुर्मा) अल्पोपहार मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजु सय्यद यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सकाळचे पत्रकार आण्णासाहेब काळे,काय सांगता न्युज चॅनेल चे संपादक अशोक मुरूमकर,संघर्ष न्युज चे संपादक सिद्धार्थ वाघमारे, सोन्याचे व्यापारी निलेश शेठ शहाणे,जमीर बागवान, अभिजित लोंढे ,संजु शेठ किरवे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सकाळ चे अण्णासाहेब काळे यांनी बोलताना सांगितले की प्रत्येक समाजातील युवकांनी पुढाकार घेत असे स्तुत्य उपक्रम राबविले पाहीजे त्यामुळे समाजा समाजातील दुरावा कमी होईल .
Comments
Post a Comment