महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : Adv. माया जमदाडे
*महिलांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या निर्मितीशिवाय समस्याचे समाधान नाही : एड. माया जमदाडे* करमाळा दि. २७ प्रतिनिधी भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध विषयावर प्रबोधन करून जागृती निर्माण करण्यासाठी परिवर्तन यात्रा सुरु असून सदर परिवर्तन यात्रा करमाळा येथे आली असता यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष एड. माया जमदाडे बोलत होत्या. यावेळी सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रज्ञाताई कांबळे या उपस्थित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या राज्यध्यक्षा संगीता शंदे आणि उपध्याक्षा ज्योती मिसाळ उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मांजरगाव ग्रामपंचायत सदस्या काजल खरात, अर्बन बँक संचालिका वंदना कांबळे आणि आशाताई क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना एड माया जमदाडे म्हणाल्या कि, आज भारतामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या हक्क अधिकारावर बंधने आणली जात आहेत. महिलांच्या ...