आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम
*आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम* करमाळा दि. 1 प्रतिनिधी बामसेफच्या 39 व्या व भारत मुक्ती मोर्चाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत तसेच 6 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील आरएसएस हेडकॉटरवर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी काढलेल्या प्रोटेस्ट मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मा. वामनजी मेश्राम साहेब यांचा जाहीर सत्कार व त्या निमित्ताने करमाळा येथे आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय जाहीर प्रबोधन संमेलनावेळी वामन मेश्राम आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या संमेलनापूर्वी आरपीआय चे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ मेश्राम यांचा भव्य सत्कार केल्या नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये हजारों लोक सहभागी झाले होते. यावेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजेग्रुप रंभापुरा, बहुजन मुक्ती पार्टी,जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, कुर्डुवाडीचे जाफर शेख आणि वि...