Posts

Showing posts from September, 2023

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

*बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन* करमाळा प्रतिनिधी  करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी लेझर खतना कॅम्प या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच या कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केली आहे. सदरची खतना सोलापूर येथील सुप्रसिद्ध खतना स्पेशलिस्ट डॉक्टर हाजी नासीर सय्यद हे करणार आहे. सदर लेझर खतना कॅम्पचे उद्घाटक एडवोकेट हाजी कलीम काझी तालुकाध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते ठेवण्यात आले असून सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काजी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफीभाई काजी, तसेच तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक जेलर समीर पटेल, तसेच हयात मेडिकल अहमदनगर येथील आदिल याकूब शेख, तसेच हाजी कलीम काजी सर दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख मंडल अधिकारी हाजी सादिक काजी बार्शी येथील निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई शेख भुमचे सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर पठाण सर तसेच डॉक्टर सादिक बागवान करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ...

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी.

Image
*राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी* करमाळा प्रतिनिधी  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्तविद्यमाने हजरत मुहम्मद पैगंबर साहेब जयंती अर्थात ईद ए मिलाद करमाळा येथील मदरसा ए फैजुल कुरआन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ व बक्षीस वाटप करण्यात आले.  यावेळी मदरशाचे कारी इस्माईल शेख, मौलाना सय्यदअली मुजावर, मौलाना सिकंदर मुलाणी, हाफिज कादिर शेख, आर. आर. पाटील, इसाक पठाण यांनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कय्युम शेख, मैनुद्दीन शेख, बशीर शेख, शहनवाज कुरेशी, सोयेब कुरेशी, अमीर मोमीन, तौसिफ मुलाणी, जैद शेख यांच्यासह बामसेफ राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, तालुका अध्यक्ष गंगाराम भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, दिनेश दळवी, भीमराव कांबळे, दिनेश माने, मधुकर मिसाळ, दीपक भोसले, रावसाहेब जाधव, विनोद हरिहर, बाबुराव पाटील, रामजी कांबळे, अद्वैत माने आदीजण उपस्थित होते.