Posts

Showing posts from June, 2023

करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी.

Image
करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल- अजहा उत्साहात साजरी- करमाळा शहर काझी. करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम अलैहीसलाम आणी हजरत ईस्माईल अलैहीसलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानी महत्व पटवून दिले.प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणार्‍या ईद-उल- अजहा सणानिमित्त समाजात एकता आणि सौहार्द वृद्धिंगत व्हावे ही शुभकामना असे सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.