Posts

Showing posts from March, 2023

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता.

Image
कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता...... . *युवा नेते शंभूराजे जगताप यांनी ऊस उत्पादक शेतकरी , ऊस वाहतुकदार व कारखान्याचे कामगार यांच्या देण्या बद्दलची प्रसार माध्यमांमध्ये मांडलेली वस्तूस्थिती बागल गटाच्या नेत्यांनी टिका समजू नये* - वनराज घोलप , अध्यक्ष ,किंग्ज फाऊंडेशन , करमाळा                                  करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याच्या माध्यमातून स्वतः च्या कुटुंबाची प्रगती करून घेतलेल्या बागल गटाच्या नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कळवळ्याच्या नावाखाली स्व . दिगंबर बागल मामा यांच्या जंयती निमीत्त दि . ९ मार्च पासून २- ३ दिवस कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . आदिनाथ - मकाई च्या कामगारांच्या रखडलेल्या पगारीमुळे कित्येक कामगारांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत . काही कामगारांनी आत्महत्या केल्यामुळे , आर्थिक चणचणी च्या तणावाखाली जगत असताना काहींना हर्ट अटॅक येऊन जीव गमवावे...