jsjhjaja
असे या भेकडपणाचे समर्थन केले गेले. प्रेयसीला मारणाऱ्या या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र नव्हते. तरीही गर्दीतील एकालाही अटकावासाठी पुढाकार घ्यावासा वाटल्याचे दिसले नाही. यातून निष्कर्ष हाच निघतो की सार्वजनिक ठिकाणी कितीही गर्दी असली तरी माणूस स्वतःला एकटा समजत असतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून ठीक असेलही, पण हे एकसंध समाज या कल्पनेलाच छेद देणारे. संकटकाळात आपला कोण व परका कोण हे न बघता मदतीलाही धावून जाण्याची वृत्ती अलीकडे कमी होत चालली. यातून हिंमत वाढते ती गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांची. प्रेयसीला ठार मारण्यासाठी रस्ता निवडला तरी काही फरक पडत नाही. कुणीही मध्ये येणार नाही अशा भावनेला बळ मिळते ते यातून. याला सामाजिक प्रगतीचे लक्षण कसे समजायचे ?