राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र प्रेरित झालेला आहे असे मत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांनी व्यक्त केले ते करमाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस भवन दत्तपेठ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुकाध्यक्षपदी आदित्य नितीन जगताप यांना नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली शेतकरी ,कामगार ,विद्यार्थी यांना नेहमीच त्यांनी पाठबळ दिलेले आहे राज्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आवाज उठवत आहे तसेच प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहे राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने करमाळ्यातील जगताप घराणे काम करत आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुक्यातील विद्यार्थी व युवकांसाठी सदैव कार्यर...